भांडण झाल्यावर चुकूनही जोडीदाराला 'हे' तीन शब्द बोलू नका, नातं सावरणं होईल कठीण

नवरा-बायकोमध्ये होणारे वाद-विवाद तर होतच असतात. पण अनेकदा भांडणात आपण असं काही बोलून जातो की त्याचा परिणाम संसारावर होतो. 

Mansi kshirsagar | Feb 15, 2025, 17:07 PM IST

नवरा-बायकोमध्ये होणारे वाद-विवाद तर होतच असतात. पण अनेकदा भांडणात आपण असं काही बोलून जातो की त्याचा परिणाम संसारावर होतो. 

1/7

भांडण झाल्यावर चुकूनही जोडीदाराला 'हे' तीन शब्द बोलू नका, नातं सावरणं होईल कठीण

3 things you should never say to your partner

काहीही बोलण्याआधी 10 वेळा विचार करायला हवा, असं आपले आई-वडिल आपल्याला सांगताना तुम्ही पाहिलेच असेल. कधीकधी अनपेक्षितरित्या बोलून गेलेल्या शब्दांचा आपल्या आयुष्यावर नकळत परिणाम होतो. 

2/7

नवरा-बायकोच्या नात्यात प्रेमाच्या गोडव्याबरोबरच थोडा राग आणि तिखटपणा गरजेचा असतो. तरच त्या नात्यातील गंमत कळते. त्यामुळं नवरा-बायकोने भांडणंदेखील एजॉय केलं पाहिजे.

3/7

नात्यातील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी संवाद खूप गरजेचा असतो. पण अनेकदा संवाद नसल्याने गैरसमज वाढतात आणि वाद विवाद होतात. 

4/7

 भांडणात असे शब्द अनेकदा निघून जातात जे सामान्य वाटत असले तरी त्याचा मनावर परिणाम होतो. अशा शब्दांमुळं नात आणि संसार उद्ध्व्स्त व्हायला वेळ लागत नाही. 

5/7

भांडणात शट अप हा शब्द खूपदा वापरला जातो. समोरच्याला शांत करण्यासाठी रागाच्या भरात Shut Up असं ओरडून जातो. मात्र हा एक रूड वर्ड असून सतत या शब्दाचा उच्चार केल्यास त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो. यामुळं जोडीदाराला वाटतं की तुम्हाला त्यांचं बोलणं एकून घ्यायचं नाहीये. 

6/7

जर तुमच्या जोडीदाराने तुम्हाला विचारलं की काय झालं, तर तुम्ही उत्तर दिलं Nothing तर हे चुकीचं आहे. हा शब्द सायलेंट ट्रीटमेंट म्हणून ओळखला जातो. यातून हे दिसून येते की, तुमच्या पार्टनरला तुमच्याशी बोलायचे आहे पण तुम्ही संवाद साधण्यास उत्सुक नाहीत. 

7/7

Wanna breakup or divorce

प्रत्येकवेळाला जेव्हा तुम्ही भांडणात वेगळे होण्याच्या वार्ता करतात तेव्हा त्याचा परिणाम नात्यावर होतो. भांडणात घटस्फोट किंवा ब्रेकअपचा उल्लेख केल्यास त्याचा परिणाम नात्यावर होते. त्यामुळं हा उल्लेख टाळावा.