मिताली मयेकरच्या सासूने केलं दुसरं लग्न, अभिनेत्रीने शेअर केले फोटो! पाहा शानदार लग्नसोहळा
Seema Chandekar Marriage Photos: नुकतंच सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा विवाहसोहळा पार पडला. या शानदार विवाहानंतर लगेच अभिनेत्याने पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
मुंबई : नुकतंच सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा विवाहसोहळा पार पडला. या शानदार विवाहानंतर लगेच अभिनेत्याने पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ही पोस्ट शेअर करत सिद्धार्थने कॅप्शनमध्ये लिहीलं की, Happy Second Innings आई!तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई!