7 वर्षात मोडला संसार, विभक्त झाली 'इश्कबाज' अभिनेत्री, स्वत:च सांगितले घटस्फोटाचे कारण

Navina Bole Divorce: अभिनेत्री नवीना बोलेबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरं तर, अभिनेत्री लवकरच तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेणार आहे. याचे कारण नुकतेच अभिनेत्रीने उघड केले आहे. 

Soneshwar Patil | Aug 27, 2024, 20:02 PM IST
1/7

'इश्कबाज'

'इश्कबाज'मधील अभिनेत्री नवीना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. रिपोर्टनुसार, अभिनेत्री 7 वर्षानंतर नवऱ्यापासून वेगळी होणार आहे.

2/7

इन्स्टाग्राम पोस्ट

अभिनेत्रीने लग्नाच्या 7 वर्षानंतर तिच्या नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने स्वत: तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. 

3/7

कॅप्शन चर्चेत

तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ती लवकरच तिच्या पतीपासून घटस्फोट घेत आहे. त्यासाठी तिची कायदेशीर औपचारिकताही सुरु झाली आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'आयुष्यात सर्वकाही चांगल्यासाठी होते'. 

4/7

वेगळे होण्याचा निर्णय

एका मुलाखतीत याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, आता दोघेही खूप कमी वेळ एकत्र घालवतो. म्हणूनच वेगळे व्हायला हरकत नाही. 

5/7

कायदेशीर प्रक्रिया

अभिनेत्रीने असेही सांगितले की ती 3 महिन्यांपासून पतीपासून वेगळी राहत आहे. आता त्यांच्यात फक्त कायदेशीर प्रक्रिया राहिली आहे. 

6/7

2017मध्ये लग्न

नवीना म्हणाली की, 4 मार्च 2017 रोजी जीत कर्नानीशी मोठ्या थाटामाटात लग्ने केलं. पण आता आमच्यामध्ये काहीही बरोबर नाही. त्यामुळे दोघांनीही सात वर्षांचे लग्न संपवण्याचा निर्णय घेतला आहे. 

7/7

'तारक मेहता..'

अभिनेत्री नवीना ही टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्येही दिसली आहे. ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून अभिनयापासून दूर आहे.