प्राजक्ता माळीची राजकारणात एन्ट्री? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ताचं मोठ विधान

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सधया तिच्या फुलवंती चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच तिने राजकारणात एन्ट्री घेण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

Soneshwar Patil | Oct 19, 2024, 16:10 PM IST
1/7

नेहमी चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या अभिनेत्री तिच्या 'फुलवंती' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. 

2/7

फुलवंती

'फुलवंती' चित्रपटातील प्राजक्ता माळीच्या भूमिकेने चाहत्यांना वेडं लावलं आहे. अशातच तिने राजकारणात एन्ट्री घेण्याबाबत मोठं वक्त्व्य केलं आहे. 

3/7

राजकारणात प्रवेश

प्राजक्ता माळीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने राजकारणात प्रवेश करणार का? यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

4/7

योग्य वेळ

प्राजक्ता माळी म्हणाली की, मी राजकारणात नक्कीच येणार आहे. पण सध्या माझ्यासाठी ही योग्य वेळ नाही. असं प्राजक्ता माळी म्हणाली. 

5/7

अनेक निर्णय

राजकारणात प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला अनेक निर्णय घेण्याची ताकद मिळते. तसेच आपल्या मतदार संघातील लोकांची कामं करण्याची संधी देखील तुम्हाला मिळते. 

6/7

तर राजकारणात येणार

प्राजक्ता माळी म्हणाली की, समाजसेवा करण्यासाठी मला राजकारणात यायचं आहे. परंतु, राजकारणात प्रवेश करण्याआधी सर्व गोष्टींचा अभ्यास करणं फार गरजेचे आहे. त्यानंतर मी प्रवेश करेन. असं प्राजक्ता म्हणाली. 

7/7

वक्तव्य चर्चेत

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ता माळीचे हे विधान प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना देखील आता उत्सुकता लागली आहे.