अवकाशातील भरारीनंतर समुद्राचा तळ गाठणार; चांद्रयान 3 नंतर आता भारताचे Matsya 6000 मिशन 'समुद्रयान'
समुद्रातील संशोधनासाठी केंद्र सरकारने ‘समुद्रयान’ ही मोहीम हाती घेतली आहे. खोल समुद्रातील खनिज संसाधनांचा शोध या मोहिमेच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.
Samudrayaan Mission: भारताच्या चांद्रयान 3 याने अवकाशात उत्तुंग भरारी घेतली आहे. यानंतर आता भारत सुमद्राचे तळ गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. चांद्रयान 3 नंतर आता भारताच्या Matsya 6000 या मिशन 'समुद्रयान' याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताची ही पहिली मानवयुक्त सागरी मोहीम आहे. Matsya 6000 पाणबुडीच्या माध्यमातून तीन व्यक्तींनी समुद्राच्या 6,000 मीटर खोलीपर्यंत नेले जाणार आहे.