अमिताभ बच्चन यांचे 'हे'7 चित्रपट कधीच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले नाहीत?

अमिताभ बच्चन यांना तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या 7 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे बॉक्स ऑफिसवर कधीच पदर्शित झाले नाहीत. जाणून घ्या सविस्तर 

Soneshwar Patil | Feb 01, 2025, 17:28 PM IST
1/7

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल. अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी बॉलिवूडची नंबर 1 जोडी असल्याचे म्हटले जाते.

2/7

दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यापैकी बहुतेक चित्रपट हिट ठरले आहेत. परंतु त्यांचा हा चित्रपट कधीही प्रदर्शित झाला नाही. 1976 मधील त्या चित्रपटाचे नाव 'दो अनजाने' आहे. 

3/7

अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांनी ‘सिलसिला’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर ते  एकत्र दिसले नाहीत. यानंतर ते 'एक था चंदेर एक थी सुधा'मध्ये दिसणार होते. मात्र, हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. 

4/7

अमिताभ बच्चन आणि  सुजित सरकार 'शूबाइट' चित्रपटात एकत्र काम करत होते. हा एक इमोशनल ड्रामा चित्रपट होता. मात्र, हा चित्रपटही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला नाही.

5/7

यानंतर 'सरफरोश' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत परवीन बाबी, कादर खान आणि शक्ती कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होते. मात्र, हा चित्रपट देखील काही कारणांमुळे प्रदर्शित झाला नाही. 

6/7

संकट चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत अमिताभ बच्चन दिसणार होते. या दोघांचा एकत्र हा पहिलाच चित्रपट होता. परंतु काही कारणांमुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही आणि मध्येच थांबवण्यात आला. 

7/7

अमिताभ बच्चन यांच्या 'आलिशान' या चित्रपटाचे शूटिंग आठवडाभर सुरू होते, मात्र त्यानंतर अचानक चित्रपट बंद करण्यात आला. त्यानंतर 1980 मध्ये अमिताभ बच्चन यांचा 'टायगर' हा चित्रपट रिलीज होणार होता. मात्र निर्माता आणि कलाकार यांच्यातील मतभेदामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही.