'...आता मी पण किस करणार'; धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर बोलताना हेमा मालिनी यांचं मोठं विधान

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी या गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे पती धर्मेंद्र यांच्या ऑनस्क्रिन किसिंग सीनमुळे चर्चेत होत्या. अनेकांनी त्यांना त्यावर प्रश्न विचारले. धर्मेंद्र यांनी रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटात त्यांचा आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्या किसिंग सीन होता. त्यावरून चांगलीच खळबळ उडाली होती. त्यावर आता हेमा मालिनी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

| Aug 25, 2023, 17:46 PM IST
1/7

हेमा मालिनी

afterdharmendrahemamaliniwillgivekissingscene

हेमा मालिनी या उत्तम अभिनेत्री असून त्या अभिनेता धर्मेंद्र यांच्या पत्नी देखील आहेत. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटात किसिंग सीन देण्यावर वक्तव्य केलं आहे.  

2/7

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' पाहिला?

afterdharmendrahemamaliniwillgivekissingscene

हेमा मालिनी यांना त्यांचे पती धर्मेंद्र यांचा चित्रपट पाहिला का? असा सवाल इंडिया डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत करण्यात आला होता.   

3/7

पतीचा चित्रपट पाहिला नाही!

afterdharmendrahemamaliniwillgivekissingscene

हेमा मालिनी यांनी खुलासा केला की त्यांनी हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यांनी धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीन पाहिला नाही. 

4/7

धर्मेंद्र यांच्याप्रमाणे देणार किसिंग सीन

afterdharmendrahemamaliniwillgivekissingscene

हेमा मालिनी हसत म्हणाल्या, 'का नाही, नक्कीच करेन. चित्रपटात किसिंग सीन महत्त्वाचा असेल तर नक्कीच. चित्रपटाच्या कथानकात जर किसिंग सीन आहे तर करेन.' 

5/7

धर्मेंद्र यांचा किसिंग सीन पाहण्यावर हेमा मालिनी म्हणाल्या...

afterdharmendrahemamaliniwillgivekissingscene

'मला नक्कीच विश्वास आहे की प्रेक्षकांना चित्रपट आवडला असेल. धर्मेंद्र जींसाठी मी खूप आनंदी आहे. त्यांना कॅमेऱ्यासमोर राहणं खूप आवडतं.' 

6/7

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं लग्न

afterdharmendrahemamaliniwillgivekissingscene

मालिनी आणि धर्मेंद्र हे 1980 साली लग्न बंधनात अडकले होते. 

7/7

इन्स्टाग्राम फॉलोवर्स

afterdharmendrahemamaliniwillgivekissingscene

हेमा मालिनी यांचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 852K फॉलोवर्स आहेत. (All Photo Credit : Hema Malini Instagram)