5 पैकी 2 वर्ष तरी तुम्ही CM होणार का? प्रश्न ऐकताच अजित पवार म्हणाले, 'ते आमचं...'

Ajit Pawar On Being CM For Atleast 2 Years: मुख्यमंत्री पदासंदर्भात बोलताना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज कराड येथे प्रितीसंगमामवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधताना प्रतिक्रिया नोंदवली. त्यावेळेस त्यांना तुम्ही किमान 2 वर्ष तरी मुख्यमंत्री होणार का? असा सवाल विचारला असता त्यांनी खास शैलीत प्रतिक्रिया नोंदवली.

| Nov 25, 2024, 15:44 PM IST
1/11

ajitpawaroncmpost

प्रसारमाध्यम प्रतिनिधिंनी कराडमध्ये अजित पवारांना किमान 2 वर्ष तरी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळणार का असा प्रश्न विचारला असता अजित पवारांनी नेमकं काय उत्तर दिलं पाहा...

2/11

ajitpawaroncmpost

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ असलेल्या प्रितिसंगमावर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळाचे दर्शन घेत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. 

3/11

ajitpawaroncmpost

या वेळी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? या प्रश्नाला अजित पवारांनी उत्तर दिलं.  

4/11

ajitpawaroncmpost

"सीएम पदाचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का?" असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जरा चिडतच क्षणाचाही विलंब न लावता, "काही नाही, आम्ही तिघे बसू आणि ठरवू! काही फॉर्म्युला वगैरे काही नाही," असं उत्तर दिलं.  

5/11

ajitpawaroncmpost

अजित पवार बोलत असतानाच अन्य एका पत्रकाराने, "देवेंद्र फडणवीसांना वाढता पाठिंबा मिळतोय," असं म्हणत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता अजित पवारांनी त्याला त्यांच्या खास शैलीमध्ये, "ऐका तरी, तू मध्येच दुसराच प्रश्न काढता," असं म्हणत शाब्दिक चिमटा काढला.   

6/11

ajitpawaroncmpost

हा प्रश्न ऐकताच अजित पवारांनी आपल्या खास शैलीमध्ये, "तुला सकाळपासून कोणी भेटलं नाही का?" असं विचारलं असता सर्व उपस्थित हसू लागले.  

7/11

ajitpawaroncmpost

"इतरांनी काय बोलावं. प्रत्येकाने आपआपल्या खाली काय आहे ते बघा ना. आमची कशाला काळजी करता. आमची काळजी करायला आमचे आमदार, आमची महायुती, माझ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते समर्थ आहोत," असं स्पष्ट मत अजित पवारांनी मांडलं.   

8/11

ajitpawaroncmpost

"तुम्ही दोन वर्ष तरी मुख्यमंत्री म्हणून बघायला मिळाला अशी अपेक्षा आहे," असं पत्राकारांनी म्हणताच अजित पवारांनी कोणाला असा प्रश्न विचारला.  

9/11

ajitpawaroncmpost

कोणाला वाटतं की मी दोन वर्ष तरी मुख्यमंत्री व्हावं असा प्रश्न अजित पवारांनी विचारला असता त्यावर पत्रकाराने जनतेला असं सांगितं.   

10/11

ajitpawaroncmpost

अजित पवारांनी हे उत्तर ऐकताच, 'ते आमचं आम्ही ठरवू' असं उत्तर दिलं. हे ऐकून सारेच हसू लागले.   

11/11

ajitpawaroncmpost

मुख्यमंत्री निवडण्यासंदर्भात बोलताना अजित पवारांनी, "काल माझी निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केली. सर्व अधिकार मला दिली. एकनाथ शिंदेंकडेही त्यांच्या पक्षाने सर्व अधिकार दिले आहेत. भाजपाची नेता निवड वगैरे ठरेल. त्यानंतर आम्ही एकमेकांशी, आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करु," असं सांगितलं.