चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारत अंतराळ क्षेत्रातली महापॉवर बनणार

संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहीमेकडे लागले आहे. अमेरिका आणि रशियानंतर चांद्रमोहीम फत्ते करणारा चीन हा तिसरा देश ठरला होता. 

Aug 22, 2023, 23:46 PM IST

Chandrayaan-3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जेव्हा चांद्रयान 3 उतरेल तेव्हा अंतराळ क्षेत्रात भारताच्या सुपरपॉवर असण्यावर शिक्कामोर्तब होईल.. याआधी जगातल्या अनेक देशांनी सुपरपॉवर होण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सफल होऊ शकले नाहीत. चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारत अंतराळ क्षेत्रातली महापॉवर बनणार आहे. 

1/5

भारताची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी ठरली तर चंद्रावर उतरणारा भारत हा जगातला चौथा देश ठरणार आहे. 

2/5

भारताच्या चांद्रयान ३ सोबत स्पर्धा करत दक्षिण ध्रुवावर भारताआधी पोहोचण्याचा रशियाचा प्रयत्न होता. मात्र त्यांचं ते स्वप्न भंगलं. 1976 नंतर पहिल्यांदाच रशियानं चंद्रावर यान पाठवलं होतं. मात्र आता रशिया रेसमधून बाद झाल्यानं त्याचा फायदा भारताला मिळणार आहे. 

3/5

काही दिवसांपूर्वीच रशिया स्पेस एजन्सीचं लुना २५ हे अंतराळ यान चंद्रावर क्रॅश झालं. 

4/5

2019 साली चीनचं यान चंद्रावर उतरलं होते. 

5/5

अमेरिका आणि रशियानंतर चांद्रमोहीम फत्ते करणारा चीन हा तिसरा देश ठरला.