अवकाशात मानव पाठवणार, सूर्यावर झेप घेणार, समुद्राचा तळ गाठणार; चांद्रयान - 3 नंतर भारताच्या लक्षवेधी मोहिमा

मिशन निसार, आदित्य आणि गगनयान या सारख्या महत्वकांक्षी मोहिमांवर इस्रो काम करत आहेत. 

Aug 22, 2023, 23:17 PM IST

ISRO's Missions After Chandrayaan-3:  भारताची चांद्रयान 3 मोहिम यशश्वी टप्प्यात आली आहे. चांद्रयान - 3 ची सॉफ्ट लँडिंग नियोजित वेळेनुसारच होणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. चांद्रयान - 3 नंतर इस्रो एकापेक्षा एक जबरदस्त मोहिमा लाँच करणार आहे. 

1/7

चांद्रयान-3 नंतर इस्रो अनेक महत्वकांक्षी मोहिमा लाँच करणार आहे. यामुळे संपूर्ण जगभरात भारताचा दबदबा वाढणार आहे.   

2/7

भारताचे समुद्रयान देखील समुद्राचा तळ गाठणार आहे. पाणबुडीच्या माध्यमातून खोल समुद्रात संशोधन केले जाणार आहे. 

3/7

भारत आणि अमेरिकेची संयुक्त मोहीम असलेला निसार (NISAR) प्रोजक्ट देखील लाँच होणार आहे.  भारत-अमेरिकेने सिंथेटिक अपर्चर रडार बनवले.   

4/7

गगनयान हा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प आहे. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून इस्रो मानवाला अवकाशात पाठवणार आहे.

5/7

INSAT-3DS हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हवामानाशी संबंधित माहिती यामुळे मिळणार आहे. 

6/7

या वर्षी XPoSat म्हणजेच X-ray Polarimeter Satellite चे प्रक्षेपण होणार आहे. हा देशातील पहिला पोलरीमीटर उपग्रह आहे. हा उपग्रह अंतराळातील क्ष-किरण स्त्रोतांचा अभ्यास करणार आहे. 

7/7

चांद्रयान- 3 नंतर भारताचे सूर्ययान म्हणजेच आदित्य-एल 1 हे मिशन लाँच होणार आहे. 30 किंवा 31 ऑगस्ट दरम्यान हे यान लाँच होईल.  आदित्य मिशन सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करणार आहे.