Anganewadi Jatra 2024 : येवा कोंकण आपलोच आसा! 'या' दिवसापासून सुरु होणार आंगणेवाडी जत्रा

Anganewadi Jatra 2024 : भराडी देवीच्या प्रसिद्ध आंगणेवाडी जत्राची तारीख घोषित करण्यात आली आहे. यंदा लोकसभा आणि पुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जत्रेला विशेष महत्त्व आहे. 

Dec 26, 2023, 08:09 AM IST
1/8

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा यंदा 2 मार्च 2024 रोजी संपन्न होणार आहे.   

2/8

मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

3/8

कोकणवासियांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेला दरवर्षीप्रमाणं यंदाही राजकीय नेतेमंडळींचीही उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेणार आहे. 

4/8

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-परदेशात कोकणातील भराडी जत्रेचं आकर्षण पाहायला मिळतं. कोकणातील (Konkan) प्रति पंढरपूर म्हणून ओळख या ठिकाणाची ओळख आहे.   

5/8

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा (Bharadi Devi) वार्षिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 

6/8

या जत्रेची तारीख देवीचा कौल घेऊन ठरवली जाते. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं म्हटलं जातं.   

7/8

दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होण्यासाठी कणकवली, कुडाळ रेल्वे स्टेशनपासून बस डेपोपर्यंत शेअर रिक्षा घ्या. या दोन्ही बस डेपोतून आंगणेवाडीला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाने बसेस जातात.   

8/8

जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने प्रवास करणार असाल तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन कुडाळ, कसाल, कणकवली मार्गे आंगणेवाडीला जाऊ शकता.