महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशन; हिमाचल आणि उत्तराखंड पण ठरतील फेल!

 महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे. महाबळेश्वरकरांना आणि इथे येणा-या पर्यटकांना गुलाबी थंडी भुरळ घालत आहे. 

Dec 25, 2023, 23:40 PM IST

Mahabaleshwar Panchgani Tourist Places : महाराष्ट्र हे निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळ आहेत. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. या हिल स्टेशन समोर हिमाचल आणि उत्तराखंड देखील फेल ठरतील.

1/7

मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर मध्ये  पाचगणी हे हिल स्टेशन आहे. 

2/7

मुंबई, पुणे, सातारा, महाबळेश्वर आणि महाड येथून पाचगणीसाठी डायरेक्ट बस आहे.  सातारा हे पाचगणीच्या सर्वात जवळचे रेल्वेस्थानक आहे.   

3/7

येथील नयनरम्य दृश्‍ये पाहिल्यानंतर आणि  सुंदर सरोवर फिरल्यानंतर हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडचा फिल येईल.    

4/7

समुद्रसपाटीपासून 1300 मीटरपेक्षा जास्त उंची असलेले हे हिल स्टेशन पर्यटकांचे खास बनले आहे.   

5/7

 मॅप्रो गार्डन आणि नयनरम्य सिडनी पॉइंटपासून वेधक राजपुरी लेणी आणि देवराई आर्ट व्हिलेजपर्यंत पाचगणीमध्ये भेट देण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत.  

6/7

सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पाच डोंगरांनी वेढलेले असल्याने हे ठिकाण पाचगणी म्हणून ओळखले जाते.  

7/7

महाराष्ट्रातील मुख्य पर्यटनस्थळ अशी पाचगणी हिल स्टेशनची ओळख आहे.