हजारो कोटींच्या लग्नात सिम्पल लुकमुळे Viral झालेली ही अप्सरा कोण?

Anjali Merchant Beautiful Look: सध्या सर्वजण अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 12 जुलै रोजी होणारा हा विवाह सोहळा खूपच चर्चेत आहे.  अनंत-राधिकाच्या ग्रहशांती पूजेच्या कार्यक्रमातील एक फोटो खूपच व्हायरल होत आहे. या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिलीय.

Jul 09, 2024, 13:54 PM IST
1/5

अंजली मर्चंटचा सुंदर लूक

राधिका ग्रह शांती पूजेमध्ये सिंपल पारंपारिक कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिची बहिण अंजली मर्चंट आणि आई शैल वीरेन मर्चंट या दोघींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं

2/5

गुजराती पद्धतीची पटोला साडी

अंजली मर्चंटने गुजराती स्टाइलची सुंदर पटोला साडी परिधान केली होती. मात्र, राधिकाचा लूक अप्रतिम असला तरी यावेळी तिची बहिण अंजलीने सर्व फॅशन प्रेमींची मने जिंकली 

3/5

गोल्डन वर्क ब्लाउजमध्ये जबरदस्त लूक

अंजलीच्या सुंदर साडीसोबतच तिच्या गोल्डन वर्क ब्लाउजची जोरदार चर्चा रंगली आहे. अंजलीला दागिन्यांची खूपच आवड आहे. त्यामुळे तिचा हा लूक अधिकच सुंदर दिसत होता

4/5

अंजली दिसतेय राणी

तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी पांढरा नेकलेस, कानातले आणि मोठा पन्नाचा हार घातला होता. त्यामुळे अंजली एखाद्या राणीप्रमाणे दिसत होती. चमकदार केस, हायलाइटर आणि पिंक लिपस्टिकमधील अंजलीचा लुक प्रेक्षक बघतच राहिले

5/5

अंजली मर्चंटने कुठे घेतलं शिक्षण?

अंजलीने मुंबईत शालेय शिक्षण घेतले असून तिने पदवीनंतर लंडन बिझनेस स्कूलमधून मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतलं आहे.