बलात्काराचा आरोप झाल्यानंतरही मदालसा शर्माने केलं मिथुनच्या मुलाशी केलं लग्न

Apr 16, 2021, 14:46 PM IST
1/6

मदालसा आणि महाअक्षयचं झालं ग्रँड वेडिंग

मदालसा आणि महाअक्षयचं झालं ग्रँड वेडिंग

2018 मध्ये ‘अनुपमा’ (Anupamaa) अभिनेत्री मदालसा शर्मा (Madalsha Sharma) चं लग्न बॉलिवूड अभिनेता मिथुन च्रकवर्ती (Mithun Chakraborty) चा मुलगा महाअक्षय (Mahaakshay Chakraborty)सोबत झाली आहे. या लग्नाला कुटुंबातील जवळची मंडळी उपस्थित होती. मदालसा शर्मा आणि महाअक्षय चक्रवर्तीचं डेस्टिनेशन वेडिंग झालं आहे.  

2/6

अशी झाली पहिली भेट

अशी झाली पहिली भेट

मदालसा शर्मा (Madalsha Sharma) ची भेट महाअक्षय (Mahaakshay Chakraborty) तेव्हा भेटले जेव्हा त्याची आई शीला डेविडसोबत एका सिनेमात काम करत होते. ही भेट छोटीच होती. मात्र दोघांमध्ये चांगली मैत्री असते. महाअक्षयने हिम्मत करून पहिल्यांदा आपलं प्रेम व्यक्त केलं. महाअक्षयचा हा अंदाज मदालसाला पसंत आला. 

3/6

अशी होती पहिली डेट

अशी होती पहिली डेट

पहिल्या डेटवर महाअक्षय चक्रवर्ती मदालसाला चायनीज रेस्टॉरंट मेनलँड चायनामध्ये गेले होते. मदालसाला चायनीज खाणं सर्वाधिक आवडतं. महाअक्षय मदालसाच्या आवडी निवडीचा विचार करत असतो. 

4/6

महाअक्षयवर लावले होते आरोप

महाअक्षयवर लावले होते आरोप

एनबीटीमध्ये आलेल्या बातमीनुसार, लग्नाच्या काही दिवस अगोदर भोजपुरी अभिनेत्रीने महाक्षय  (Mahaakshay Chakraborty) वर बलात्काराचा आरोप केला होता. एवढंच नव्हे तर जबरदस्ती अबॉर्शन करण्याचा आरोप देखील केला होता. योगिता बाली नावाच्या तरूणीने आरोप केले आहेत. 

5/6

...तरी देखील मदालसाने केलं लग्न

...तरी देखील मदालसाने केलं लग्न

हे लग्न 7 जुलै 2018 साली होणार होती. मात्र त्याचवेळी पोलीस लग्नाच्या ठिकाणी पोहोचले आणि लग्न थांबवलं. अस होऊनही मदालसा  (Madalsha Sharma) ने महाअक्षय (Mahaakshay Chakraborty) सोबत लग्न केलं आहे. त्या दोघांनी रजिस्टर्ड लग्न केलं आहे. 

6/6

ऊटीमध्ये केलं ग्रँड वेडिंग

ऊटीमध्ये केलं ग्रँड वेडिंग

दोघांनी काही दिवस थांबून तामिळनाडूच्या ऊटीमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केलं आहे. लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि अगदी जवळचे मित्र परिवार पोहोचले होते. इंडस्ट्रीत या लग्नाची खूप चर्चा रंगली आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.