Electric Scooters Tips: वाढवा तुमच्या ई-बाईकच्या किलोमीटरची रेंज, जाणून घ्या सोप्या टीप्स

How to Maximize Your E-Scooter Range: भारतात आता इलेक्ट्रीक स्कुटरला (Electic Scooter) मागणी वाढू लागली आहे. बटेजमध्ये आणि इंधनाची कटकट नसल्याने ई-बाईकचा (E-Scooter) खप वाढला आहे. भारतीय बाजारपेठेत (Indian Market) अनेक कंपन्यांच्या ई-बाईक्स आल्या आहेत. यात 60 किलोमीटर ते 200 किलोमीटर रेंजपर्यंतच्या ई-बाईक्स उपलब्ध आहेत. कमी कर्चात जास्त अंतर कापण्यासाठी या ई-बाईक्स उपयोगी ठरत आहेत. पण ई-बाईक्स रेंज (Range) देत नसल्याच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. बॅटरी लवकर संपत असेल तर त्यात तांत्रिक बिघाड आहे असं नाही. काही सोप्या टीप्स वापरुन तुम्ही आपल्या बॅटरीचं लाईफ वाढवू शकता.

राजीव कासले | May 03, 2023, 18:22 PM IST
1/5

जास्त वजन ठेवू नये

ई-बाईक्सवर ओव्हरलोड करु नका. शक्यतो सहप्रवासी न घेता एकट्यानेच प्रवास करा. वजन वाढल्याने ई-बाईक्सची रेंज कमी होण्याची शक्यता असते. तसंच बॅटरी आणि इंजिनही लवकरच खराब होऊ शकते.

2/5

बॅटरी लाईफ वाचवा

इलेक्ट्रीक स्कूटरची रेंज त्याच्या बॅटरीवरही अवलंबून असते. बॅटरी कमी चार्ज असेल, तर अधिक रेंज मिळणार नाही. त्यामुळे बॅटरी पूर्ण चार्ज करा. याशिवाय ई-बाईक्सच्या बॅटरीवर मोबाईल कनेक्टिव्हीटी, म्यूझिक सिस्टम, नेव्हिगेशनसारखे फिचर्स गरजेपेक्षा जास्त वापरु नका.

3/5

वेग मर्यादित राखा

ई-बाईक चालवताना त्याचा वेग वारंवार कमी-जास्त करुन नका. इलेक्ट्रीक स्कूटर कमी आरपीएमवर चालवली तर त्याची रेंजही वाढते.

4/5

सिग्नलवर स्कूटर बंद करा

ट्रॅफिक सिग्नलवर तुम्हाला बराचवेळ एकाच जागेवर थांबवं लागत असेल तर अशा परिस्थितीत शक्यतो इलेक्ट्रीक स्कूटर बंद ठेवा. त्यामुळे बॅटरीची बचत होईल. पण काही वेळच थांबायचं असेल तर स्कूटर बंद करु नका.

5/5

डीप डिस्चार्ज

बॅटरी पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत काही स्कूटर बंद करत नाहीत.याला डीप डिस्चार्ज म्हणतात. म्हणजे बॅटरी पूर्ण संपूर्ण संपेपर्यंत वापरु नका. असं केल्यास बॅटरीच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बॅटरी 20 टक्के उरली असताना ती चार्जिंग करणं केव्हाही चांगलं.