सकाळी उठताच चुकूनही करु नका 'ही' कामं, अन्यथा...

Apr 14, 2018, 06:09 AM IST
1/5

दात न घासता खाणं: सकाळी उठल्यावर ब्रश न करताच खाणाऱ्या व्यक्तींना नेहमी आरोग्याच्या समस्या जाणवतात. कारण, ब्रश न करताच खाद्य खाल्ल्यास आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यावर आणि खाण्यापूर्वी ब्रश नक्की करावा.

2/5

धूम्रपान करणं: धूम्रपान करणं हे आरोग्यासाठी धोकादायक आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र, सकाळी उठताच तात्काळ धूम्रपान करणं हे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे कॅन्सर होण्याचा धोकाही वाढतो.

3/5

कॉफी पिणे: बहुतेक नागरिक हे सकाळी उठताच कॉफी किंवा चहा पितात आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतात. मात्र, सकाळी उठताच कॉफी पिल्यास कोर्टिसोलचं प्रमाण वाढतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर लगेचच कॉफी पिणं टाळा.

4/5

आळस: आपल्यापैकी अनेकजण हे सकाळी उठल्यानंतर घरातच लोळत पडत राहतात. बराच वेळ ब्रश करत नाही आणि फ्रेशही होत नाहीत. मात्र, असं करणं खूपच चुकीचं आहे. सकाळी उठताच शरिराचा व्यायाम झाला नाही तर ते आरोग्यासाठी धोकादायक आहे.

5/5

कम्प्युटर किंवा मोबाईलचा अतिवापर: सध्याच्या काळात अनेकजण हे सकाळी उठताच मोबाईल किंवा कम्प्युटर घेऊन बसतात. मात्र, असं करणं खूपच वाईट आहे. यामुळे आपला दिनक्रम बिघडतो. त्यामुळे पसकाळी उठताच कम्प्युटर किंवा मोबाईलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.