रामलल्लाचं भव्य मंदिर, गर्भगृह आणि प्राणप्रतिष्ठा... 10 फोटोमध्ये पाहा अयोध्येचं सौंदर्य
भारतासह जगभरातील रामभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, तो क्षण अखेर संपूर्ण जगाने याची देही, याची डोळा अनुभवला. अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांसह हजारोच्या संख्येने रामभक्त उपस्थित होते. या सोहळा ऐतिहासिक बनवण्यासाठी अयोध्या नगरी फुलांनी सजली होती.

500 वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली. अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली, यावेळी त्यांच्याबरोबर उत्त प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानात, संघप्रमुक मोहन भागवत गर्भगृहात उपस्थित होते.