Ram Mandir Pran Pratishtha : श्रीराम विराजमान होतील तेव्हा 'या' गोष्टी नक्की करा!

Ram Mandir Pran Pratishtha : वर्षानुवर्षे ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण आज आला आहे. प्रभू राम अयोध्येतील नवीन मंदिरात विराजमान होणार आहे. यादिवशी श्रीरामाची कृपा कायम तुमच्यावर राहावी म्हणून आजच्या दिवशी ही कामं नक्की करा. 

Jan 22, 2024, 09:02 AM IST
1/9

घरोघरी प्रभू श्रीरामाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहे. 

2/9

घरात सकारात्मक वातावरण असावं, सुख - समृद्धी नांदावी म्हणून श्रीराम प्राणप्रतिष्ठा दिनी काही उपाय तुम्हाला फलदायी ठरतील. 

3/9

घर आणि देवघराची स्वच्छता करुन देवपूजा करा. त्यानंतर केशर, मखणा आणि पंचमेवा घालून खीरीचा नैवेद्य श्रीरामाला दाखवा. 

4/9

घरामध्ये प्रभू रामाच्या स्वागतासाठी दिवे लावा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचे दिवे लावा. 

5/9

गरीब आणि गरजू लोकांना पिवळ्या रंगाच्या फळांचं दान करणे शुभ मानले गेले आहे. 

6/9

श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर घरात शंखनाद करा. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. 

7/9

पूजा संपन्न झाल्यानंतर घराबाहेर हळदीचे पाणी शिंपडावे आणि रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्यामुळे वास्तूदोष दूर होतात.   

8/9

घरात कापूर आणि धूपाचा धूर केल्यामुळे घरातील शुद्धता होते आणि वाईट शक्तींचा नाश होतो. 

9/9

यादिवशी घरात रामचरितमानस, हनुमान चालीसा यांचं वाचन करावं. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहतं. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)