सॅलरी अकाऊंटवर फुकटात मिळतात 10 सुविधा! बँका सांगत नाहीत,खूपच कमी लोकांना माहिती!

सॅलरी अकाऊंट होल्डरला बॅंकेकडून अनेक ऑफर्स, सुविधा मिळतात पण फार कमी जणांनाच याबद्दल माहिती असते. आपण अशा 10 सुविधांबद्दल जाणून घेऊया. 

| Nov 27, 2024, 18:58 PM IST

Salary Account Benifits: सॅलरी अकाऊंट होल्डरला बॅंकेकडून अनेक ऑफर्स, सुविधा मिळतात पण फार कमी जणांनाच याबद्दल माहिती असते. आपण अशा 10 सुविधांबद्दल जाणून घेऊया. 

1/11

सॅलरी अकाऊंटवर फुकटात मिळतात 10 सुविधा! बँका सांगत नाहीत,खूपच कमी लोकांना माहिती!

Bank benefits for salary accounts Utility Marathi News

Salary Account Benifits: आपला दरमहिन्याचा पगार बॅंकेत ज्या अकाऊंटला जमा होतो ते असतं आपलं सॅलरी अकाऊंट. हे खात आपल्या नियमित इतर खात्यांप्रमाणेच असतं. पण यात तुम्हाला बॅंकेकडून अनेक ऑफर्स, सुविधा मिळतात पण फार कमी जणांनाच याबद्दल माहिती असते. आपण अशा 10 सुविधांबद्दल जाणून घेऊया.

2/11

विमा संरक्षण

Bank benefits for salary accounts Utility Marathi News

काही सॅलरी अकाऊंट्सवर अपघाती मृत्यू कवच किंवा आरोग्य विमा संरक्षण मिळते.

3/11

उत्तम व्याजदराने कर्ज

Bank benefits for salary accounts Utility Marathi News

सॅलरी अकाऊंट्सवर वर ग्राहकांना वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्जावर चांगले व्याजदर मिळतात. अनेक बँक तुम्हाला कमी व्याजावर कर्ज देतात.

4/11

ओव्हरड्राफ्ट सुविधा

Bank benefits for salary accounts Utility Marathi News

सॅलरी अकाऊंट्समध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध असते. ज्यामुळे तुमच्या खात्यात पैसे नसले तरी आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढू शकता.

5/11

प्राधान्य सेवा

Bank benefits for salary accounts Utility Marathi News

अनेक बँका सॅलरी अकाऊंट होल्डर्सना प्राधान्य सेवा देतात. ज्यामध्ये तुम्हाला जलद सेवा, विशेष ग्राहक सेवा क्रमांक आणि विशेष ऑफर मिळतात.

6/11

क्रेडिट कार्ड ऑफर

Bank benefits for salary accounts Utility Marathi News

अनेक बँका सॅलरी अकाऊंट्सवर मोफत क्रेडिट कार्ड आणि उत्तम ऑफर देतात. यामध्ये वार्षिक फी आणि रिवॉर्ड पॉइंट्समध्ये सवलतीचा समावेश असतो.

7/11

ऑनलाइन शॉपिंग आणि डिनर ऑफर

Bank benefits for salary accounts Utility Marathi News

बँका सॅलरी अकाऊंट्स होल्डर्सना ऑनलाइन शॉपिंग आणि डिनरच्या ऑफर्स देतात. यामध्ये सूट आणि कॅशबॅकचा समावेश असतो.

8/11

डिजिटल बँकिंगची मोफत सेवा

Bank benefits for salary accounts Utility Marathi News

सॅलरी अकाऊंटमध्ये एनईएफटी, आरटीजीएससारख्या डिजिटल सेवा अनेक ठिकामी विनामूल्य असतात. ज्यामुळे कॅश ट्रान्सफर सोपे होते.

9/11

मोफत चेक बुक आणि डेबिट कार्ड

Bank benefits for salary accounts Utility Marathi News

बँका अनेकदा सॅलरी अकाऊंट होल्डर्सना मोफत चेकबुक आणि डेबिट कार्ड सेवा देतात. असे छोटे छोटे खर्च तुमच्या बचतीचे कारण बनू शकतात.

10/11

मोफत एटीएम व्यवहार

Bank benefits for salary accounts Utility Marathi News

सॅलरी अकाऊंटमध्ये सर्वसाधारणपणे मोफत ट्रान्झाक्शन दिले जातात. तुमच्या गरजेनुसार कोणताही एक्स्ट्रा चार्ज न देता तुम्ही कॅश काढू शकता.

11/11

झिरो बॅलेन्सचे फायदे

Bank benefits for salary accounts Utility Marathi News

सॅलकी अकाऊंट्समध्ये झिरो बॅलन्सचा फायदा मिळतो. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची काळजी करण्याची गरज नाही. सेव्हिंग अकाऊंट्समध्ये ही सुविधा नसते.