Eknath Shinde on Maharashtra CM: एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाची विधानं; ज्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

Eknath Shinde on Maharashtra CM: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. ठाण्यात आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत त्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी केलेली काही महत्त्वाची विधानं जाणून घ्या.   

| Nov 27, 2024, 17:55 PM IST

Eknath Shinde on Maharashtra CM: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. ठाण्यात आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत त्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी केलेली काही महत्त्वाची विधानं जाणून घ्या. 

 

1/7

Eknath Shinde on Maharashtra CM:  एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळावर आपण समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी पत्रकार परिषदेत केलेली काही मोठी विधानं जाणून घ्या.

2/7

"आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत. आम्ही लढून काम करणारे आहोत. एवढा मोठा विजय ऐतिहासिक आहे. याचं कारण जीव तोडून मेहनत घेतली, निर्णय घेतले. आम्ही घरी बसलो नाही. आम्ही मनापासून काम केलं. मी शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणार आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे महत्त्वाचं आहे"   

3/7

"लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी माझी ओळख निर्माण झाली. सर्व बहिणींनी लक्षात ठेवलं. लाडका भाऊ ही नवी ओळख मला सर्वात मोठी वाटते"  

4/7

"मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. सरकार बनवताना, निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची, उद्योगधंदे आणण्याची संधी दिली आहे.  तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे"   

5/7

"तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असं मनात आणू नका, मी अमित शाह यांनाही फोन करुन भावना सांगितल्या. जो काही निर्णय असेल तो मान्य असेल"  

6/7

"भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबद्दल जो काही निर्णय घेईल त्याला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल. जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असं सांगितलं आहे. कोणतीही कोंडी, नाराजी नाही आहे. येथे कोणताही स्पीडब्रेकर नाही. महाविकास आघाडीचा स्पीडब्रेकर आम्ही काढला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह जो काही निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे,"   

7/7

"मी स्व:तला मुख्यमंत्री न समजता सामान्य व्यक्ती म्हणून काम केलं. यामुळे मला कोणताही अडथळा येत नव्हता. सर्वसामान्यांसाठी महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे असं मी ठरवलं होतं. महायुती सरकारच्या माध्यमातून मी सर्वांसाठी काम केलं."