PHOTO : वडील होते IPL चे स्पॉन्सर, 40 हजार कोटींचे साम्राज्य धुडकावून मुलगा बनला संन्यासी, CSK शी थेट संबंध

Who is Ajahn Siripanyo : वयाच्या 18 व्या वर्षी 40 हजार कोटींचे साम्राज्य धुडकावून तो संन्यासी झाला. त्याचे वडील हे मलेशियातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. 

| Nov 27, 2024, 15:42 PM IST
1/7

मलेशियातील दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज आनंद कृष्णन यांचा मुलगा वेन अजहन सिरीपान्योने आपल्या वडिलांची 40 हजार कोटींची अफाट संपत्ती आणि आलिशान आयुष्य सोडून तो संन्यासी झाला. 

2/7

आनंद कृष्णन हे पूर्वी दूरसंचार कंपनी एअरसेलचे मालक होते. कृष्णन यांनी आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे स्पॉन्सर केलं होतं. दूरसंचारशिवाय ते उपग्रह, मीडिया, तेल, वायू आणि रिअल इस्टेट क्षेत्रातही त्यांचं साम्राज्य पसरलंय. 

3/7

वेन अजहन सिरीपान्योची आई एम सुप्रिंदा चक्रबन यांचं थायलंडच्या राजघराण्याशी कौटुंबिक संबंध आहेत. मीडिया रिपोर्टनुसार वेन अजहन सिरीपान्योने वयाच्या 18 वर्षीं संन्यास घेतलाय. 

4/7

वेन अजहन सिरीपान्योने मातृभूमी थायलंडला जाऊन बौद्ध मठाला भेट दिली आणि भिक्षू होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अध्यात्मिक अनुभवासह दोन दशकांनंतर तो बौद्ध भिक्षू बनवला. तेव्हा आलिशान आयुष्य सोडून तो जंगलातील बौद्ध मठात भिक्षूकाचे आयुष्य जगत आहे. 

5/7

वेन अजहन सिरीपान्योबद्दल असं म्हटलं जातं की त्यांचं बालपण ब्रिटनमध्ये गेले. त्यांना दोन बहिणींनी आहेत. त्याला इंग्रजी, तामिळ आणि थाईसह  8 भाषा येतात. त्यांचे संगोपन, विविध संस्कृतींचे ज्ञान आणि जीवनाकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन त्यांना बौद्ध शिकवणींकडे आकर्षित केलं. 

6/7

सध्या तो संन्यासी म्हणून जगतो, मात्र आवश्यकतेनुसार सिरिपॅन्यो कधी कधी त्याच्या जुन्या जीवनशैलीकडे परतो. ते वडिलांच्या भेटण्यासाठी वेळ काढतो. बौद्ध धर्मातील एक सिद्धांत कौटुंबिक प्रेमाच्या महत्त्वावर जोर देण्यात आल्यामुळे तो कुटुंबालाही वेळ देतो. 

7/7

तो एकदा इटलीमध्ये कृष्णनला भेटण्यासाठी खाजगी जेटने गेल्याची चर्चा होती. त्याने पेनांग हिल येथे आध्यात्मिक रिट्रीटमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर वडिलांनी त्याचा सोयीसाठी पेनांग हिल खरेदी केला.