Holi 2024: स्वस्तात मस्त! होळीच्या सुट्टीत मथुरेतील 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

 मथुरा, वृंदावन आणि गोकुळ येथील परिसर मंदिरांनी समृद्ध आहे. रोज रोजच्या व्यस्त जीवनशैलीतून निवांतपणा अनुभवायचा असल्यास तुम्ही मथुरेला जाण्याचा प्लान नक्की करू शकता. निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या मथुरेला धार्मिक परंपरेचा वारसा ही लाभला आहे. 

Mar 16, 2024, 20:37 PM IST

श्रीकृष्णाची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मथुरेला हिंदू धर्मात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. श्रीकृष्णाच्या मथुरेत होळीचा मोठा उत्सव साजरा करण्यात येतो.

1/6

देशभरातील कृष्णभक्तांसाठी मथुरेत होळी साजरी करणं हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. त्यामुळे यंदा शनिवार, रविवार आणि होळीची सुट्टी लागोपाठ असल्याने सुट्यांमध्ये तुम्ही मथुरेला जाण्याचा प्लान करु शकता.   

2/6

श्रीकृष्णाची मथुरानगरी फिरायची झाल्यास तुम्हाला फार खर्च लागत नाही. दिल्लीवरून मथुरेला जाण्याकरीता बससेवा उपलब्ध आहे. दिल्ली ते मथुरा बसने जाण्यासाठी 200 शुल्क आकारलं जातं. तुम्ही बसव्यतिरीक्त ट्रेनने ही जाऊ शकता.मथुरेला ट्रेनने जाण्यासाठी तुम्हाला 2000 रुपये शुल्क आकारलं जातं.याशिवाय खिशाला परवडतील असे हॉटेल्स ही आहेत. 

3/6

कृष्णजन्मभूमी

वासुदेव आणि देवकीला पोटी ज्या कारागृहात कृष्णाचा जन्म झाला त्या ठिकाणाला पर्यटक आणि भाविक मोठ्या प्रमाणात भेट देतात. देश विदेशतील पर्यटकांसाठी हे कारागृह आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथील कारागृहात काही गुहा आहेत. या गुहा पाहण्यासाठी तुम्हाला 10 रुपये शुल्क आकारलं जातं. 

4/6

बांके बिहारी मंदिर

वृंदावनमधील बांके बिहारी मंदिर येथे आठवडाभर फुलांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्यात येते. बांके बिहारी मंदिर होणारा होळीचा उत्सव हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे. या मंदिराची रचना राजस्थानी स्थापत्यशैलीतील असून या मंदिरात घंटानाद केला जात नाही.   

5/6

रंगनाथ मंदिर

भारताततील भव्य मंदिरांपैकी एक म्हणजे वृंदावन येथील रंगनाथ मंदिर. रंगनाथाच्या अवतारातील श्रीकृष्णाच्या या  मंदिराची रचना दाक्षिणात्य शैलीतील आहे. या ठिकाणाला भाविक मोठ्या श्रद्धेने भेट देतात.   

6/6

प्रेम मंदिर

2001 मध्ये श्री सद्गगुरू कृपालुजी महाराज यांनी प्रेम मंदिराची उभारणी केली. द्वारिकाधीश मंदिर, निधिवन, गोवर्धन पर्वत, कुसुम सरोवर यमुनेचा  घाट हे वृंदावनच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.  प्रेम मंदिर परिसरातील विलोभनीय निसर्गसौंदर्य भाविकांना मंत्रमुग्ध करते.