'या' सुंदर देशात पाऊल टाकताच भारतीय बनतात करोडपती; सोबत फक्त 50 हजार रुपये घेवून जा
Laos : पैसा कुणाला नको असतो, पैसे कमावण्यासाठी कुणी नोकरी करतो तर कुणी व्यापार. काही लोक वाईट मार्गानं पैसे कमवतात. जगात एक असा देश आहे तिथं तुमच्याजवळ केवळ 50 हजार रूपये जरी असले तरी तुम्हाला करोडपती म्हंटलं जाईल.
Laos Facts : तुम्ही कोट्यधीश असाल किंवा नसाल, पण आपल्याजवळ भरपूर पैसे असावेत आपण श्रीमंत व्हावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. मध्यमवर्गीय लोकांना कोट्यधीश होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात आणि बराच काळ धीर धरावा लागतो. मात्र तुम्हाला फार पैसे न कमावता कोट्यधीश व्हायचं असेल तर जगातील एक देश तुमची वाट पाहतोय. या देशात आल्यानंतर तुम्हाला कोट्यधीश असल्याची अनुभूती मिळते. या देशाचं नाव आहे लाओस.



