'या' प्रसिद्ध अभिनेत्री 'हिट' सोबत 'फिट'ही आहेत, पाहा PHOTO

बॉलिवूड अभिनेत्रींनाही फिटनेसमध्ये टाकतात मागे, कोण आहेत 'या' प्रसिद्ध अभिनेत्री? 

Nov 10, 2022, 22:17 PM IST

मुंबई : अभिनेते आणि अभिनेत्रींना मोठ्या अथवा छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी फिट राहावेच लागते. त्यामुळे हे स्टार्स दररोज वर्कआऊट करून स्वत:ला फिट ठेवत असतात. या संदर्भातले त्यांचे अनेक फोटो व्हायरलही होत असतात. त्यात आता आम्ही तुम्हाला काही फिट राहणाऱ्या अभिनेत्रींविषयी माहिती देणार आहोत. या अभिनेत्री कोण आहेत, त्या जाणून घेऊयात. 

1/5

नम्रता मल्ला

bhojpuri actress, bhojpuri actress workout, namrita malla, pakhi hegde, akshara singh, rani chatterjee, monalisa, marathi news, news in marathi

नम्रता मल्ला सोशल मीडियावर खुप चर्चेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. नम्रता स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करते आणि तिचे फोटोही शेअर करत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत असतो. 

2/5

अक्षरा सिंग

 bhojpuri actress, bhojpuri actress workout, namrita malla, pakhi hegde, akshara singh, rani chatterjee, monalisa, marathi news, news in marathi

भोजपुरीची प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंगही फिटनेसच्या बाबतीत खुप पुढे आहे. अक्षरा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळते. त्याचवेळी, अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे वर्कआउट व्हिडिओ शेअर करून लोकांना फिटनेसबद्दल जागरुक करत असते.  

3/5

पाखी हेगडे

bhojpuri actress, bhojpuri actress workout, namrita malla, pakhi hegde, akshara singh, rani chatterjee, monalisa, marathi news, news in marathi

प्रसिद्ध अभिनेत्री पाखी हेगडेही फिटनेसच्या बाबतीत खुप सजग आहे. पाखी वर्कआऊटसोबतच तिच्या डाएटची खूप काळजी घेते. याशिवाय ती सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. या फोटोंना खुप लाईक्स आणि कमेंट मिळत असतात. विशेष म्हणजे पाखी दोन मुलींची आई देखील आहे, मात्र तिची फिटनेस पाहून तसे अजिबात वाटत नाही.

4/5

राणी चॅटर्जी

 bhojpuri actress, bhojpuri actress workout, namrita malla, pakhi hegde, akshara singh, rani chatterjee, monalisa, marathi news, news in marathi

भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी सुरुवातीला खुप लठ्ठ होती, यामुळे ती ट्रोलिंगची शिकार देखील व्हायची. मात्र आता राणीने तिच्या फिटनेसकडे लक्ष दिले आहे. राणीनेही तिचा फॅट टू फिट प्रवास खूप चांगल्या पद्धतीने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याचबरोबर ती दररोज तिच्या वर्कआउटचे फोटो शेअर करत असते.

5/5

मोनालिसा

bhojpuri actress, bhojpuri actress workout, namrita malla, pakhi hegde, akshara singh, rani chatterjee, monalisa, marathi news, news in marathi

भोजपुरी चित्रपटांची स्टार मोनालिसाने आता छोट्या पडद्यावरही आपला दबदबा निर्माण केला आहे. बिग बॉसनंतर मोनालिसा घरोघरी प्रसिद्ध झाली आणि अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये दिसली. त्याच वेळी, मोनालिसा स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिममध्ये कठोर परिश्रम करते. त्याचबरोबर ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.