महत्वाची बातमी : अधिवनेशापूर्वी संजय राठोडांची गच्छंती?

महाविकास आघाडीमधील अत्यंत महत्वाची बातमी 

| Feb 26, 2021, 08:25 AM IST

कृष्णात पाटील, झी मीडिया,  मुंबई : महाराष्ट्रात गेले काही दिवस वनमंत्री संजय राठोड (Sanajay Rathod) यांच्या नावाची खूप चर्चा होत आहे. टीकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा (Pooja Chavan Suicide Case) संजय राठोड यांच्याशी संबंध असल्याची चर्चा होत आहे. विरोधकांकडून वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी (CM Uddhav Thackeray force to Sanjay Rathod for resign) जोर धरत असताना मुख्यमंत्र्यांनी देखील संजय राठोड यांना बजावलं आहे. 

1/5

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा देणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. 'मी निर्णय घेण्यापूर्वी तू निर्णय घे', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांना बजावलं आहे. संजय राठोड यांची अधिवेशनापूर्वी गच्छंती होणार अशी चर्चा रंगली आहे. संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी वाढता दबाव पाहता ही मागणी होऊ लागली आहे. 

2/5

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनेक व्हिडीओ क्लीप आणि फोटो समोर आले आहेत. या प्रकरणात आता भाजप नेत्या चित्रा वाघा यांनी देखील उडीत घेतली असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

3/5

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी 17 दिवस उलटूनही गुन्हा का दाखल केला नाही? भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे. तर पुणे पोलिसांकडून हा तपास काढून घ्यावा अशी मागणी देखील केली आहे. 

4/5

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत असंही चित्रा वाघ म्हणाल्या. तर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

5/5

संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची चित्रा वाघ यांनी मागणी केली. एवढे पुरावे असून अद्याप साधा एफआयआर का दाखल झाली नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.