बर्थडे स्पेशल : जावेद अख्तर यांनी शब्दांनी बनवली बॉलिवूडमध्ये ओळख
Jan 17, 2018, 11:42 AM IST
1/8
कवी, गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचा आज ७३वा वाढदिवस. त्यांचा जन्म १७ जानेवारीला १९४५ मध्ये ग्वालियरमध्ये झाला होता. त्यांचं शिक्षण लखनऊमध्ये झालं. त्यांचे वडील निसार अख्तर गीतकार-कवी होते आणि आई सफिया शिक्षिका, गायिका, लेखिका होत्या.
2/8
जावेद अख्तर सिने इंडस्ट्रीतील एक असं नाव आहे ज्यांना परिचयाची गरज नाहीये. सलीम सोबत त्यांनी अनेक हिट सिनेमे दिलेत. दोघांनी अनेक सिनेमांसाठी एकत्र पटकथा लिहिल्या.
TRENDING NOW
photos
3/8
दोघांच्या जोडीला बॉलिवूडमध्ये सलीम जावेद नावाने ओळख मिळाली होती. अख्तर यांनी पद्मश्री आणि पद्मविभूषणही देण्यात आला.
4/8
दोघांनी १९८७ पर्यंत एकत्र काम केलं. पण नंतर दोघांमध्ये मतभेद झाले. शेवटचं एकत्र काम त्यांनी ‘मिस्टर इंडिया’साठी केलं.
5/8
जावेद यांनी हनी इराणीसोबत १९७२ मध्ये लग्न केलं होतं. हनी याही एक पटकथा लेखिका होत्या. दोघांनी १९७८ मध्ये घटस्फोट घेतला.
6/8
दरम्यान, त्यांची जवळीक अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी वाढली. १९८४ मध्ये त्यांनी लग्न केलं.
7/8
हनी इराणी आणि जावेद अख्तर यांचा फरहान अख्तर हा मुलगा आणि झोया अख्तर मुलगी आहे.
8/8
जावेद अख्तर यांना ५ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link