Fadnavis on Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंशी माझं वैर नाही, मी आजही...", फडणवीस स्पष्टच बोलले

उद्धव ठाकरेंनी आपल्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले असून त्यांनी माझा फोन घेतला नव्हता असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंशी आपलं वैयक्तिक वैर नसल्याचं सांगत त्यांनी रश्मी ठाकरेंशी भेट झाल्याचा किस्साही सांगितला

Jan 25, 2023, 10:53 AM IST

1/5

BJP, Devendra Fadnavis, Shivsena, Uddhav Thackeray

"माझ्याकडून कोणतीही कटूता, वैर नाही. राजकीयदृष्ट्या मी विरोधक असून अतिशय ताकदीने विरोध करणार. पण माझं वैयक्तिक वैर नाही. आजही मी त्यांच्यासह चहा पिऊ शकतो, गप्पा मारु शकतो. परवा एका कार्यक्रमात मला वहिनी भेटल्या तेव्हा त्यांच्याशी बोललो. उद्धव ठाकरेंना माझा नमस्कार सांगा असं मी त्यांना म्हणालो. महाराष्ट्राची ती संस्कृती असून तिच्या पलीकडे मी जाणार नाही," असं फडणवीसांनी सांगितलं.

2/5

BJP, Devendra Fadnavis, Shivsena, Uddhav Thackeray

"कोणत्याही परिस्थितीत मला अडकवा, जेलमध्ये टाका असे आदेश महाविकास आघाडीने दिले होते. तुम्ही पोलिसांना विचारलंत तर तेदेखील सांगतील," असंही फडणवीस म्हणाले.   

3/5

BJP, Devendra Fadnavis, Shivsena, Uddhav Thackeray

"मी राजकीय वैर ठेवत नाही. आमचं सरकार राजकीय वैराने वाढणारही नाही. पण या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट पोलीस आयुक्त संजय पांडेंना देण्यात आलं होतं. पण मला अटक व्हावी असं मी काहीच केलं नव्हतं. यामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत," असा दावा फडणवीसांनी केला.   

4/5

BJP, Devendra Fadnavis, Shivsena, Uddhav Thackeray

"आजही माझं उद्धव ठाकरेंशी वैर नाही. पण माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे त्यांनीच बंद केले. माझा फोनही त्यांनी घेतला नाही. पाच वर्षं आपण ज्यांच्यासह काम करतो, ज्यांच्यासह सरकार चालवतो त्यांचा किमान फोन तरी उचलला पाहिजे आणि तुमच्यासोबत यायचं नाही असं सांगितलं पाहिजे. पण त्यांनी मातोश्रीचे दरवाजे बंद केले याचं दु:ख आहे," असं फडणवीसांनी सांगितलं.   

5/5

BJP, Devendra Fadnavis, Shivsena, Uddhav Thackeray

राज्यात युती तुटल्यापासून उद्धव ठाकरे आणि भाजपा नेत्यांमधील संबंधांमध्ये कटूता आली आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले जात असून युती तुटल्यासाठी जबाबदार धरलं जात आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंशी आपलं वैयक्तिक वैर नसून आपण आजही त्यांच्याशी गप्पा मारु शकतो असं ते म्हणाले आहेत. जाणून घेऊयात नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे.