कार घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी; नवीन वर्षात वाढणार 'या' कंपनीच्या गाड्यांची किंमत

प्रत्येकाला आपली स्वत: ची एक गाडी हवं असं स्वप्न असतं. त्यात भारतीय म्हटल्यावर सणाच्या दिवशी आपण गाडी घेतो किंवा मग नवीन वर्षात... पण आता तुम्ही नवीन वर्षात गाडी घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर आजच वाचा ही बातमी...

| Nov 22, 2024, 18:52 PM IST
1/7

लग्झरी गाड्या म्हटलं की त्यात जर्मनीची कंपनी बीएमडब्ल्यूचं देखील नाव येतं. भारतीयांमध्ये बीएमडब्ल्यू गाडीला घेऊन एक वेगळं क्रेझ आहे. बीएमडब्ल्यूच्या वेगवेगळ्या मॉडल्सची किंमत हळूहळू वाढू लागल्या आहेत. 

2/7

गाड्यांच्या कंपनीची किंमत ही जानेवारी 2025 पासून वाढणार आहे. त्यानुसार, बीएमडब्ल्युच्या गाड्यांची किंमत 3 टक्क्यांनी वाढणार असल्याचं म्हटलं जातं आहे. 

3/7

सध्या कंपनी ज्या मॉडेल्सची निर्मिती करत आहे. त्या कोणत्या गाड्या आहेत आणि त्यांच्या रेंजविषयी जाणून घेऊया. यात 2-सीरीज ग्रॅन कूप, 3-सीरीज लॉन्ग व्हीलबेस, 5-सीरीज लॉन्ग व्हीलबेस, 7-सीरीज लॉन्ग व्हीलबेस, एक्स1, एक्स3, एक्स5, एक्स7 आणि एम 340 आय सारखे काही मॉडेल्स त्यात सहभागी आहेत. 

4/7

या गाड्यांची भारतात खूप मागणी आहे. बीएमडब्ल्यू कम्प्लीट बिल्ट यूनिट्स (सीबीयू) च्या रुपात आय 4, आय 5, आय 7, एम 70, आयएक्स 1, बीएमडब्ल्यू आयएक्स , जेड 4 एम 40 आय, एम2 कूप सारखे मॉडेल्स भारतीय मार्केटमध्ये उपलब्द आहेत आणि त्यांची विक्री होते. 

5/7

गेल्या आठवड्यात मर्सिडीज-बेंजनं इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाली, इन्फ्लेशन होण्याच्या माहितीमुळे आणि हाय ऑपरेटिंग एक्सपेंसेस विषयी सांगितलं आहे. 

6/7

हे सगळं  पाहता एक जानेवारी 2025 पासून भारतात सगळ्या मॉडेल्सची किंमत ही तीन टक्क्यांनी वाढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. 

7/7

भारतात मर्सिडीज-बेंज गाड्यांची किंमत ही जीएलसीसाठी 2 लाख रुपयांपासून टॉप मर्सिडीज-मेबॅक एस 680 लग्झरी लिमोसिनसाठी नऊ लाख रुपयांपर्यंत वाढणार आहे.