सेलिब्रिटींनी असा साजरा केला 'करवा चौथ'

Oct 28, 2018, 08:35 AM IST
1/8

सेलिब्रिटींनी असा साजरा केला 'करवा चौथ'

भारत हा विविधतेत नटलेला एक देश असल्यामुळे या देशात तितकच वैविध्य हे सणांमध्येही दिसून येतं. असंख्य चालीरिती आणि परंपरांच्या या सण- उत्सवांमधीलक एक असणारा असा करवा चौथ नुकताच साजरा करण्यात आला. वैवाहिक महिलांच्या, जोडप्यांच्या आयुष्यात त्यांच्या नात्याच्या दृष्टीने या सणाना फार महत्त्वं दिलं जातं. पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर ठेवल्या जाणाऱ्या या निर्जळी उपवासाचं महत्त्वं तसं प्रत्येकाच्या लेखी वेगळं असलं तरीही यंदा सेलिब्रिटी विश्वात त्याचे बरेच पैलू पाहायला मिळाले. चला तर मग पाहूया सेलिब्रिटींनी कसा साजरा केला 'करवा चौथ'... 

2/8

सेलिब्रिटींनी असा साजरा केला 'करवा चौथ'

अभिनेता आयुषमान खुरानाने त्याच्या पत्नीसाठी म्हणजेच ताहिरा कश्यप हिच्यासाठी करवा चौथचा उपवास केला. ताहिराच्या नावाचं आद्याक्षरही त्याने आपल्या हातावर काढल्याचं पाहायला मिळालं. 

3/8

सेलिब्रिटींनी असा साजरा केला 'करवा चौथ'

टेलिव्हिजन विश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांनीही अनोख्या अंदाजात करवा चौथ साजरा केलं. 

4/8

सेलिब्रिटींनी असा साजरा केला 'करवा चौथ'

अभिनेत्री सोनम कपूरचं हे पहिलं करवा चौथ. सोनमने आनंद आणि तिच्या नावाची आद्याक्षरं आपल्या हातावर काढत करवा चौथ साजरा केलं. 

5/8

सेलिब्रिटींनी असा साजरा केला 'करवा चौथ'

सोनम कपूरच्याच्या माहेरी म्हणजेच अनिल कपूर यांच्या घरीसुद्धा दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी 'करवा चौथ'चा उत्साह पाहायला मिळाला. 

6/8

सेलिब्रिटींनी असा साजरा केला 'करवा चौथ'

क्रिकेटच्या मैदानात विरोधी संगाच्या नाकी नऊ आणणाऱ्या विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांनीही एकमेकांना 'सर्वस्व' म्हणत करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या. 

7/8

सेलिब्रिटींनी असा साजरा केला 'करवा चौथ'

क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनेही इस्न्टाग्रामवर पत्नीसोबतचा हा सुरेख फोटो शेअर केला. 

8/8

सेलिब्रिटींनी असा साजरा केला 'करवा चौथ'

सेलिब्रिटी वर्तुळात यंदा काही जोडप्यांचं हे पहिलच करवा चौथ आहे. त्यापैकीच एक म्हणजे गौतम रोडे आणि त्याची पत्नी.