'भूल भुलैया 3' प्रदर्शित होताच कार्तिक आर्यन सिद्धिविनायकाच्या चरणी, पाहा फोटो

'भूल भुलैया 3' प्रदर्शित झाल्यानंतर कार्तिक आर्यनने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, पाहा फोटो

Soneshwar Patil | Nov 01, 2024, 19:03 PM IST
1/7

भूल भुलैया 3

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. अशातच कार्तिक आर्यन बप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोहोचला होता. 

2/7

प्रचंड प्रतिसाद

कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. 

3/7

अ‍ॅडव्हान्स बुकिंग

सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून 'भूल भुलैया 3' चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून देखील मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. 

4/7

आशीर्वाद

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणपती बप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला होता. 

5/7

फोटो व्हायरल

यावेळी त्याने पापाराझींसाठी वेगवेगळ्या पोज देखील दिल्या. सध्या सोशल मीडियावर त्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

6/7

मंदिराबाहेर गर्दी

कार्तिक आर्यनचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याला पाहण्यासाठी त्याचे चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.  सिद्धिविनायक मंदिराबाहेर देखील चाहत्यांनी गर्दी केली होती. 

7/7

प्रार्थना

यावेळी नुकताच प्रदर्शित झालेल्या भूल भुलैया चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने चांगल्या कमाईसाठी प्रार्थना केली.