वरुण धवननं का घेतली दोन आलीशान घरं? दुसरं कुणासाठी?

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याच्या 'बेबी जॉन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच अभिनेत्याने जुहूमध्ये दोन आलीशान घरे घेतली आहेत. पण दुसरे कोणासाठी? वाचा सविस्तर  

| Jan 08, 2025, 18:57 PM IST
1/7

वरुण धवन

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि पत्नी नताशा दलाल आई-वडील झाल्यानंतर अभिनेत्याने मोठी गुंतवणूक केली आहे. 

2/7

घराची किंमत

मुंबईतील जुहूमध्ये वरुण धवन आणि नताशा यांनी दोन आलीशान घरे विकत घेतली आहेत. या घराची किंमत 86.92 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. 

3/7

आलीशान घर

इंडेक्सटॅपच्या दोघांनी सहाव्या आणि सातव्या मजल्यावर ही घरे घेतली आहेत. या आलीशान घराचा कार्पेट एरिया 5,112 चौरस फूट आहे.   

4/7

पार्किंग

सध्या या इमारतीचे काम सुरु आहे. यावर्षी मे महिन्यापर्यंत हे घर पूर्ण तयार होईल असे सांगण्यात येत आहे. यामध्ये अभिनेत्याला 4 वाहनांसाठी पार्किंग मिळाले आहे. 

5/7

करुणा धवन

ज्यामध्ये सहाव्या मजल्यावर अभिनेता वरुण धवन आणि नताशा हे राहणार आहेत. तर सातव्या मजल्यावरील घर वरुण धवनने त्याची आई करुणा धवन यांच्यासाठी घेतलं आहे. 

6/7

3 डिसेंबरला नोंदणी

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या दोन्ही मालमत्तेची नोंदणी 3 डिसेंबरला झाली आहे. दोघांनी जवळपास 2.67 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.  

7/7

बॉलिवूड सेलिब्रिटी

वरुण धवनच्या नवीन घराजवळ बॉलिवूड सेलिब्रिटींची देखील घरे आहेत. ज्यामध्ये अजय देवगन, शाहरुख खान, धर्मेंद्र, आमिर खान यांचा समावेश आहे.