1/8
Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच
![Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/10/305656-r8.jpg)
सौंदर्य, अदाकारी , मादकता या साऱ्याचं उत्तम समीकरण असणारी अभिनेत्री कोण? असा प्रश्न विचारला असता क्षणाचाही विचार न करता असंख्यजण एकच नाव घेतात. ते नाव म्हणजे रेखा. गेली कित्येक दशकं आपल्या सौंदर्याच्या अभिनयाच्या बळावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस. रेखा यांचं आयुष्य म्हणजे एक रहस्य आहे, असा कित्येकांचा समज. सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये स्वत: या माध्यमापासून दूर राहणाऱ्या पण, तरीही या माध्यमावर तितक्याच चर्चेत असणाऱ्या या चिरतरुण अभिनेत्रीविषयी जाणून घेऊया काही रंजक गोष्टी.
2/8
Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच
![Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/10/305655-r7.jpg)
भानुरेखा गणेशन असं त्यांचं खरं नाव. दाक्षिणात्य अभिनेता जेमिनी गणेशन आणि अभिनेत्री पुष्पवल्ली यांची ती मुलगी. माध्यमांमध्ये उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार गणेशन आणि पुष्पवल्ली यांनी कधीच लग्न केलं नाही. किंबहुना रेखा आणि त्यांच्या आईसोबतची त्यांचं चांगलं नातं नव्हतं. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. कुचुंबाला आधआर देण्यासाठी त्यांनी सुरुवातीचा काही काळ बी- ग्रेड चित्रपटटांमध्येही काम केलं.
3/8
Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच
![Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/10/305654-r6.jpg)
4/8
Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच
![Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/10/305653-r4.jpg)
विश्वभ्रमंती करण्याचं स्वप्न फार आधीपासूनच त्यांनी बाळगलं होतं. ज्यामुळे एअरहॉस्टोस होण्याची त्यांची फार इच्छा होती. रेखा यांची ही इच्छा अपूर्ण राहिली खरी. पण, अभिनय क्षेत्राच्या निमित्ताने त्यांना जगभर प्रवास करण्याची संधी मिळाली हेसुद्धा नाकारता येणार नाही. एक काळ असा होता जेव्हा नन होण्याचा विचारही त्यांच्या मनात आला होता.
5/8
Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच
![Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/10/305652-r3.jpg)
सुपरस्टार होणं, प्रसिद्धीझोतात येणं, खुप महागड्या कारमधून फिरणं, मोठ्या घरात राहणं ही स्वप्नहील त्यांनी सुरुवातीपासून पाहिली. एक दिवस मीसुद्धा स्टार होणार असं म्हणणाऱ्या रेखा यांची त्यांच्या काही मित्रमंडळींनी खिल्लीही उडवली. पण, अखेर सावन भादों या चित्रपटाच्या यशानंतर खरंच रेखा यांच्या वाट्याला त्यांनी इच्छिलेल्या गोष्टी येण्यास सुरुवात झाली होती.
6/8
Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच
![Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/10/305651-r2.jpg)
7/8
Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच
![Happy Birthday Rekha : रेखा यांची 'ती' इच्छा अपूर्णच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2018/10/10/305650-r1.jpg)