'या' अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावले होते बॉलिवूडला वेड, 16 वर्षात एकही हिट चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत अभिनेत्री

90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री, जिच्या सौंदर्याने संपूर्ण बॉलिवूडला वेड लावले होते. आज ती बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. 

| Jan 16, 2025, 18:27 PM IST
1/7

टॉप अभिनेत्री

90 च्या दशकातील अभिनेत्रीचे सौंदर्य आणि स्माईल आजही प्रेक्षकांना वेड लावते. सौंदर्यासोबत या अभिनेत्रीने कमाईमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना  मागे टाकले आहे. 

2/7

सौंदर्याचे किस्से

57 वर्षांच्या या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे किस्से आजही इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहेत. या अभिनेत्रीने 1984 मध्ये मिस इंडिया ब्यूटी पेजेंटमध्येही भाग घेतला होता.

3/7

जूही चावला

या अभिनेत्रीचे नाव आहे जूही चावला. अभिनेत्रीने 'सल्तनत' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यानंतर जूही चावलाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला. 

4/7

चित्रपट

तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यासोबतच तिला चित्रपटांमध्ये जबरदस्त यश मिळालं आहे. चित्रपटांसह अभिनेत्रीने व्यवसाय देखील करण्यास सुरुवात केली. 

5/7

जय मेहता

जुही चावलाचा नवरा जय मेहता हे खूप मोठे उद्योगपती आहेत. त्यांनी शाहरुख खानसोबत आयपीएल टीममध्ये मोठी रक्कम गुंतवली आहे. 

6/7

शेवटचा चित्रपट

सध्या अभिनेत्री फिल्मी दुनियेपासून दूर आहे. तिने कोणताही हिट चित्रपट दिलेला नाहीये. 2009 मध्ये तिने शेवटचा हिट चित्रपट दिला होता. त्यानंतर तिला चित्रपटांमध्ये यश मिळाले नाही. 

7/7

नेटवर्थ

Hurun च्या रिपोर्टनुसार, जूही चावला ही बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. जिची एकूण नेटवर्थ ही सुमारे 4600 कोटी रुपये इतकी आहे.