2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेले 'हे' 5 चित्रपट; 'या' वर्षात मिळाला नाही एकही हीट चित्रपट

या वर्षात सिनेगृहात बॉलिवूडचे कित्येक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मोठ्या बजेटमध्ये बनणाऱ्या या चित्रपटांना मात्र हवे तसे यश न मिळाल्याने त्यातील बरेच चित्रपट हे फ्लॉप ठरले आहेत. 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेल्या या चित्रपटांची यादी नक्की वाचा. 

Feb 11, 2025, 12:43 PM IST

2025 Flopped Movie List: या वर्षात सिनेगृहात बॉलिवूडचे कित्येक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मोठ्या बजेटमध्ये बनणाऱ्या या चित्रपटांना मात्र हवे तसे यश न मिळाल्याने त्यातील बरेच चित्रपट हे फ्लॉप ठरले आहेत. 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेल्या या चित्रपटांची यादी नक्की वाचा. 

 

1/7

बॉलिवूडचे चित्रपट

2025 मध्ये बॉलिवूडचे आजवर अनेक बिग बजेट तसेच बहुप्रतिक्षित चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहेत. पण त्यातील बरेच चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यास अयशस्वी ठरले आणि म्हणूनच बॉलिवूडला अद्याप या वर्षातील पहिला हिट चित्रपट मिळालेला नाही.  

2/7

हीट चित्रपटासाठी बॉलिवूडचे प्रयत्न

2025 या वर्षाची सुरुवात अजय देवगणच्या 'आजाद' या चित्रपटाने झाली. आत्तापर्यंत बॉलिवूडचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आहेत. मात्र हे वर्ष बॉलीवूडसाठी लकी ठरत नसल्याचे समोर येत आहे. खरंतर, या वर्षात प्रदर्शित झालेले बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. चला पाहूयात बॉलिवूडच्या फ्लॉप चित्रपटांची यादी.  

3/7

आजाद

या वर्षाच्या सुरुवातीला 17 जानेवारी रोजी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अजय देवगणचा 'आजाद' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजय देवगणचा भाचा अमन देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांचे काम पाहायला मिळाले. 40 कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सात दिवसात फक्त 6.77 कोटी रुपयांची कमाई केली.    

4/7

इमरजेंसी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'इमरजेंसी' 17 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. राजकारणाशी संबंधित असणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नसल्याचं दिसून आलं. या चित्रपटाचे बजेट 60 कोटी रुपये इतके असून या चित्रपटाने 10 दिवसात बॉक्स ऑफिसवर केवळ 6.70 कोटींची कमाई केली आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.  

5/7

लवयापा

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि अभिनेत्री खुशी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'लवयापा' चित्रपट प्रदर्शित झाला. 7 फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला हा प्रेक्षकांमध्ये चर्चेत होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात फ्लॉप ठरला.  

6/7

देवा

शाहिद कपूरचा 'देवा' चित्रपट 31 जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. यामध्ये शाहिद कपूरसोबत अभिनेत्री पूजा हेगडेची केमिस्ट्री पाहायला मिळाली. पण या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु शकली नसल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. हा चित्रपट 50 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता.  

7/7

गेम चेंजर

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि राम चरण यांचा गेम चेंजर हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही धमाकूळ घालेल अशी चर्चा सुरू होती. पण 450 कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 16 दिवसांत केवळ 130 कोटींची कमाई केली.