सलमाननं पनवेलच्या फार्महाऊसला दिलंय खास व्यक्तीचं नाव, Inside Photos पाहून थक्क व्हाल

salman khan : ही जागा म्हणजे भाईजानचं पनवेल येथील फार्महाऊस. मुंबईच्या धकाधकीच्या आय़ुष्यातून मिळेल तसा वेळ काढत सलमान त्याच्या या फार्महाऊसवर येत असतो.

May 04, 2023, 16:30 PM IST

अभिनेता सलमान खान गेली काही वर्षे त्याचा वाढदिवस, काही महत्त्वाचे कार्यक्रम एका खास ठिकाणी साजरा करताना दिसला. इतकंच काय, तर कोरोनाच्या लॉकडाऊन काळातही त्यानं इथं बराच काळ व्यतीत केला होता.

1/7

सलमान खान आणि कुटुंब

bollywood Salman Khans Panvel farmhouse inside photos

कुटुंबातील मंडळींचीही त्याला साथ असते. (bollywood Salman Khans Panvel farmhouse inside photos )  

2/7

फार्महाऊसला खास ओळख

bollywood Salman Khans Panvel farmhouse inside photos

तुम्हाला माहितीये का, हे फार्महाऊस त्याच्यासाठी अतिशय खास आहे. इतकं की त्यानं याचं नावही खास व्यक्तीलाच समर्पित केलंय. ती व्यक्ती म्हणजे सलमानची बहीण.  

3/7

सलमानचा निवांत वेळ

bollywood Salman Khans Panvel farmhouse inside photos

अर्पिता खान शर्मा, हिच्याच नावावरून सलमाननं त्याच्या फार्महाऊसला Arpita Farmes असं नाव दिलं आहे. इथं सलमान बराच निवांत वेळ घालवताना दिसतो.

4/7

150 एकर भूखंड

bollywood Salman Khans Panvel farmhouse inside photos

सूत्रांच्या माहितीनुसार हे फार्महाऊस 150 एकर इतक्या विस्तीर्ण भूखंडावर स्थिरावलं असून, त्याच्या आजुबाजूला शेती, बागा आहे.

5/7

फार्महाऊसवरील पाहुणे

bollywood Salman Khans Panvel farmhouse inside photos

प्राण्यांप्रती सलमानला ओढ असल्यामुळं इथं घोडे आणि इतरही काही प्राणी पाहायला मिळतात.

6/7

सलमान आणि शेती....

bollywood Salman Khans Panvel farmhouse inside photos

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, इथं फार्म हाऊसची सेंद्रीय शेतीसुद्धा आहे. खुद्द सलमाननंही इथं शेतीची कामं करण्याचा अनुभव घेतला होता.

7/7

फार्महाऊसच्या उभारणीसाठीची किंमत...

bollywood Salman Khans Panvel farmhouse inside photos

जवळपास 80 कोटी इतक्या प्रचंड रकमेत उभ्या राहिलेल्या या फार्म हाऊसमध्ये आजवर सलमानच्या मित्रमंडळींनीही हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं आहे.