Budhaditya Yog : 'बुधादित्य राजयोग'चा 31 मार्चपर्यंत प्रभाव, 'या' राशींची लोक होणार मालामाल

Budhaditya Yog : अवकाशात वेळोवेळी ग्रहांचं संक्रमण होतं असतं. ही एक खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात याला बरं महत्त्व आहे. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो त्याला ग्रह गोचर असं म्हणतात. सध्या कुंडलीत 'बुधादित्य राजयोग' तयार झाला आहे. याचा परिणाम काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. 

Mar 19, 2023, 09:06 AM IST

Budhaditya Yog : ज्योतिषशास्त्रानुसार 31 मार्चपर्यंत शुभ योग घडून आला आहे. कुंडलीत 'बुधादित्य राजयोग' तयार झाला आहे. त्यामुळे अनेक राशींना याचा जबरदस्त फायदा होणार आहे. 12 पैकी 5 राशींवर या योगामुळे तुफान फायदा होणार आहे. त्यांचा आयुष्यातील हा सर्वात जबरदस्त काळ असणार आहे. 

1/5

मेष (Aries)

Budhaditya Yog surya and budh these lucky zodiac signs get money and success astro news in marathi

या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग अतिशय लाभदायक ठरणार आहे. त्यांना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. नोकरीमध्ये उत्तम प्रगती होईल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. रखडलेली कामं मार्गी लागतील. 

2/5

वृषभ (Taurus)

Budhaditya Yog surya and budh these lucky zodiac signs get money and success astro news in marathi

या राशीच्या लोकांसाठीही बुधादित्य राजयोग आनंद घेऊन आला आहे. प्रत्येक कामात तुम्हाला फायदा होणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. व्यावसायिकांसाठी हा सर्वात उत्तम आणि लाभदायक काळ आहे. हा योग या राशीच्या लोकांसाठी धनलाभ घेऊन आला आहे.

3/5

कर्क (Cancer)

Budhaditya Yog surya and budh these lucky zodiac signs get money and success astro news in marathi

या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग वरदान ठरणार आहे. कठीणहून कठीण कामात तुम्हाला यश मिळणार आहे. कामातील अडथळे, रखडलेली काम सहजरित्या पू्र्ण होणार आहेत, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. नोकरीत पदोन्नती आणि पगार वाढीची शक्यता असल्याचंही संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 

4/5

कुंभ (Aquarius)

Budhaditya Yog surya and budh these lucky zodiac signs get money and success astro news in marathi

या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग भाग्यशाली ठरणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. प्रत्येक कामात नफा मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ या राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

5/5

मीन (Pisces)

Budhaditya Yog surya and budh these lucky zodiac signs get money and success astro news in marathi

बुधादित्य राजयोग हा या राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा सर्वात भाग्यशाली काळ असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. व्यापाऱ्यांमध्ये महत्त्वाचे करार होणार आहे. हा काळ या राशीच्या धनलाभ घेऊन येणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.