फक्त 10 हजार रुपयांमध्ये सुरु करा 'हे' Business आणि खोऱ्याने पैसे कमवा ...
चा बिझनेस करू शकता तेही कमी खर्चात. इतकंच नाही तर यामध्ये तुमची कमाईही चांगली होईल.
तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुमचे हे स्वप्न आत्मनिर्भर भारत मिशनच्या माध्यमातून सहज साकार होऊ शकतं. या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कर्ज मिळू शकतं. आम्ही तुम्हाला अशा Business Idea सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या स्वत:चा बिझनेस करू शकता तेही कमी खर्चात. इतकंच नाही तर यामध्ये तुमची कमाईही चांगली होईल.
1/5
जर तुम्ही चांगले स्कॉलर असाल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही ऑनलाइन कोर्स सुरू करू शकता. (Start Your Online Classes). बँक, एसएससीपासून (SSC) सिव्हिल सर्व्हिसेसपर्यंतची तयारीही आता ऑनलाइन केली जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन शिक्षकांचीही मागणी आहे. असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जे फक्त ऑनलाइन कोर्सेसमधून करोडोंची उलाढाल करत आहेत. यामध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागणार नाही.
2/5
घरबसल्या व्यवसाय करायचा असल्यास बेकरी प्रॉडक्टस बनवण्याची सुरुवात करु शकता. तुम्ही ब्रेड बनवायला सुरुवात करू शकता. तुम्ही ब्रेड बनवून बेकरी किंवा बाजारात पुरवू शकता. यामध्ये जास्त गुंतवणूक गरज नाही. ब्रेडला बाजारात कायम मागणी असते. तुम्ही फक्त 10,000 रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला गव्हाचे पीठ किंवा मैदा, मीठ, साखर, पाणी, बेकिंग पावडर किंवा ईस्ट, फूड आणि मिल्क पाउडर असे मटेरियल लागेल.
3/5
4/5
जर तुम्हाला लिहायचे असेल तर तुम्ही 'ब्लॉगिंग' (ब्लॉगमधून उत्पन्न) चांगले पैसे कमवू शकता. तुमच्याकडे लेखन कौशल्य असेल तर तुम्ही कुठेही बसून कमाई करू शकता. जर तुम्ही मोठ्या लेवलवर ब्लॉगिंग सुरू केले तर तुम्ही तुमची स्वतःची वेबसाइट देखील तयार करू शकता. त्याच्या प्रमोशनसाठीही अनेक प्लॅटफॉर्म आहेत. यामुळे, तुम्हाला काही महिन्यांत कमाई सुरू होईल.
5/5