भारती-शहनाजपासून ते हिना खानपर्यंत सर्वांनी वापरली वजन कमी करण्यासाठी 'ही' ट्रीक
आजकाल प्रत्येकाचं फिटनेस टारगेट सेट केलेलं असत. सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच लोक आता फिटनेस फ्रिक झाले आहेत. प्रत्येकजण स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिम, योगा आणि परिपूर्ण आहार असं काही ना काही करत असतोच. परंतु बऱ्याच लोकांना याबाबत योग्य माहिती नसते, ज्यामुळे त्याचा उलट परिणाम देखील भोगावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्ही अशा काही Weight Loss ट्रीक्स सांगणार आहोत. जे अभिनेत्रींनी देखील फॉलो केलं आहे आणि ज्यामुळे त्यांचं वजन देखील कमी झालं आहे.
Celebs Weight Loss Diet Plan: आजकाल प्रत्येकाचं फिटनेस टारगेट सेट केलेलं असत. सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच लोक आता फिटनेस फ्रिक झाले आहेत. प्रत्येकजण स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिम, योगा आणि परिपूर्ण आहार असं काही ना काही करत असतोच. परंतु बऱ्याच लोकांना याबाबत योग्य माहिती नसते, ज्यामुळे त्याचा उलट परिणाम देखील भोगावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्ही अशा काही Weight Loss ट्रीक्स सांगणार आहोत. जे अभिनेत्रींनी देखील फॉलो केलं आहे आणि ज्यामुळे त्यांचं वजन देखील कमी झालं आहे.



लॉकडाऊनमध्ये ट्रांसफॉर्मेशन करणाऱ्या शहनाज गिलनं 6 महिन्यांत 12 किलो वजन कमी केलं. तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं की, तिने नॉन-वेज, चॉकलेट आणि आईस्क्रीमपासून स्वतःला पूर्णपणे दूर केलं आहे. तसेच, आपल्या रोजच्या डाएटमध्ये जास्त वरायटी घेत नव्हती. तिला दोन चपात्यांची भूक लागायची तेव्हा ती एकच चपाती खायची आणि अजूनही हेच करते.


