भारतीय रेल्वेने बांधला जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज

Apr 06, 2021, 17:17 PM IST
1/6

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल (World`s Highest Railway Bridge), जम्मू-कश्मीर बारामुला लिंक रेल्वे प्रोजेक्ट (Jammu and Kashmir Baramulla Link Rail Project) वर बनत आहे. चिनाब नदीवर हा पूल बनत आहे. रेल्वे यावर आता रुळ बसवण्याचं काम करणार आहे. 272 किलोमीटर लांब या रेल्वे लिंक प्रोजेक्टचा 161 किलोमीटर ट्रॅक तयार आहे. 119 किलोमीटरचा ट्रॅक टनलमधून जाणार आहे.

2/6

सर्वात मोठं आव्हान

सर्वात मोठं आव्हान

चिनाब नदीवर पूल बांधणं हे रेल्वेचं खूप मोठं य़श आहे. कटरा ते बनिहाल पर्यंत 111 किलोमीटर लांब भाग जो जोडतो. जगाच्या इतिहासात पहिल्यांदा हा उंच पूल बनत आहे. भारतीय रेल्वेने हे आव्हान पूर्ण केलं.

3/6

चिनाब नदीवर पूल

चिनाब नदीवर पूल

5.6 मीटर लांब धातुचा तुकडा आज सर्वात उंच बिंदुवर फिट केला गेला आहे. दोन्ही बाजुच्या तारांना जो जोडतो. 359 मीटर खाली असलेल्या चिनाब नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे.

4/6

विज्ञान आणि तंत्रज्ञानांचं उत्तम उदाहरण

विज्ञान आणि तंत्रज्ञानांचं उत्तम उदाहरण

स्वातंत्र्यानंतर भारतीय रेल्वे (Indian Railway History) च्या इतिहासास हा पूल विज्ञान आणि तंत्रज्ञानांचं उत्तम उदाहरण म्हणून पुढे येणार आहे. प्रोजेक्टमध्ये एकूण 38 टनल आहेत. सर्वात लांब टनल ही 12.75 किलोमीटरची आहेत. ब्रिज बनवण्यासाठी एक खास प्रकारची केबल वापरण्यात आली आहे. ज्याची क्षमता 20 आणि 37 मेट्रीक टन आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 266 किलोमीटर प्रति तासाने जरी वारे वाहत असतील तरी हा पूल हलणार नाही.

5/6

111 किलोमीटरचं कठीण सेक्शन

111 किलोमीटरचं कठीण सेक्शन

उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंकवर 111 किलोमीटरचा हे सर्वात कठिन सेक्शन आहे. उत्तर रेल्वेने डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवलं होते. 272 किलोमीटरच्या या रेल्वे लिंकवर 28 हजार कोटींचा खर्च होणार आहे, 111 किलोमीटरचा हा कटडा-बनिहाल सेक्शनचं काम पूर्ण झालं आहे. 2002 मध्ये याला राष्ट्रीय प्रोजेक्ट घोषित केला गेला होता.

6/6

पहिल्यांदा ओवरहेड केबल क्रेनचा वापर

पहिल्यांदा ओवरहेड केबल क्रेनचा वापर

भारतीय रेल्वेने पहिल्यांदा ओवरहेड केबल क्रेनचा वापर केला आहे. 10 डिग्री सेल्सियस ते 40 डिग्री सेल्सियस तापमानात ते उपयुक्त आहेत. हा पुल 266 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने येणाऱ्या वाऱ्याचा देखील सामना करु शकतात. हा पूल देशात पहिल्यांदा डीआरडीओच्या मार्गदर्शनानुसार बांधला गेला आहे.