मुलांच्या वाढीस 'हे' 5 सुपरफूड बेस्ट, आहारात समावेश केल्याने शरीर आणि बुद्धीचा विकास

Superfoods For Children: आपण आपल्या मुलांच्याबाबत खूपच हळवे असतो. मुले खाताना नखरे करतात. त्यामुळे पालक चिंतेत असतात. तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करता आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न करत असता. मुलांना विकासासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांची गरज असते. तुमच्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित आहारात कोणते सुपरफूड समाविष्ट केले जाऊ शकते ते जाणून घ्या.

Jul 04, 2023, 15:23 PM IST
1/5

केळी हे असे फळ आहे की ते सर्वांनाच खायला आवडते. जर मुलांनी हे रोज खाल्ले तर त्यांच्या शरीराला व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम, पोटॅशियम, बायोटिन आणि फायबर मिळत राहतील. केळी मुलांना ऊर्जा देण्याचे काम करते.

2/5

सुका मेवा मुलांना दिल्यास त्यांची चांगली वाढ होते. नट हे पोषक तत्वांनी युक्त असतात, जे मुलांच्या वाढीसाठी चांगले असतात.  नट पेस्ट म्हणून किंवा ग्राउंड स्वरुपात नटांचा समावेश आहारात केला पाहिजे. काही संभाव्य जोखमीमुळे 5 वर्षाखालील मुलांनी संपूर्ण नट देणे टाळावे.

3/5

अंडी हे अत्यावश्यक सुपरफूडपैकी एक मानले जाते, आरोग्य तज्ज्ञ अनेकदा ते नाश्त्यात खाण्याची शिफारस करतात. यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-डी, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि फॉलिक अ‍ॅसिडसह अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक आहेत.

4/5

दुधाला संपूर्ण अन्न म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे मुलांच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात. यामुळे शरीराला कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मिळतात. ज्यामुळे मुले मजबूत बनण्यास मदत होते.

5/5

ओट्स हे अतिशय आरोग्यदायी अन्न आहे. त्यात फायबर आणि बीटा-ग्लुकन असते जे हृदयाचे आरोग्य सुधारते कारण ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. मुलांच्या आरोग्यासाठी तुम्ही नाश्त्यात ओट्स मुलांना खाऊ घालू शकता.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)