Children's Day Wishes in Marathi: 'बालपण देगा देवा'; बालदिनानिमित्त द्या खास शुभेच्छा!
Children's Day Wishes 2024 in Marathi: भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी 'बालदिन' साजरे केले जाते. या दिनानिमित्त आपल्या जवळच्यांना पाठवा खास बालदिनाचे मराठमोळे संदेश.
दरवर्षी भारतात 14 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करत आहे. 1959 पासून दरवर्षी हा दिवस 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलानल नेहरू यांना लहान मुलांबद्दल खूप प्रेम होते आणि ते त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणत असतं. 1964 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर संसदेत एक ठराव मंजूर करण्यात आला आणि त्यांचा जन्मदिवस भारतात 'बालदिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बालदिनाच्या निमित्ताने मुलांना आणि जवळच्या नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.






