संपूर्ण जगासाठी टाईम बॉम्ब आहे हा डेंजर प्रोजेक्ट! पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली; NASA कडून धोक्याचा इशारा
Three Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा मोठा परिणाम पृथ्वीवर झाला आहे.
China Three Gorges Dam : चीन मध्ये जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी तब्बल 18 वर्षांचा कालावधी लागला. 1994 मध्ये या धरणाचे बांधकाम सुरू झाले. 2012 मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले. चीनच्या हुबेई प्रांतातील यांगत्से नदीवर बांधण्यात आले आहे. ही जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे. हे धरण बांधण्यासाठी सुमारे 4 लाख 63 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. जवळपास 14 लाख घरं या धरणाच्या बांधकामामुळे प्रस्थापित झाली.