बापरे! मानवी मेंदूत बसवली चीप; Elon Musk च्या कंपनीचा करिष्मा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या एलॉन मस्क यांच्या न्यूरललिंक या कंपनीला माणसाच्या मेंदूत एक विशिष्ट यंत्र बसवून ते कार्यरत करण्यात यश आलंय.

| Jan 30, 2024, 09:29 AM IST
1/7

भारतीय वेळेनुसार, सोमवारी रात्री अमेरिकेत डॉक्टरांनी टेलिपथी नावाचं एक यंत्र रुग्णाच्या मेंदूत यशस्वीपणे बसवलंय. याविषयीची माहिती स्वतः एलॉन मस्क यांनी दिली आहे.

2/7

टेलिपथी या यंत्राने ज्यांना हात किंवा पाय नाहीत अशा व्यक्तींना मोबाईल, कॉम्प्युटर अशी उपकरणं फक्त विचार करुन वापरता येणार आहेत. 

3/7

गेली अनेक वर्ष मस्क यांची न्यूरललिंक ही कंपनी माणसांच्या मेंदूत चिप बसवून त्याद्वारे त्यामाणासांचे जीवन सुकर करण्यासाठी यंत्र तयार करण्यासाठी संशोधन करतेय. अनेक वर्षांच्या काळानंतर न्यूरललिंकला यंत्राच्या मानवी चाचण्या करण्याची परवानगी अमेरिकन अन्न आणि औषध नियंत्रण मंडळाने दिली. 

4/7

याच परवानगीनंतर मानवी चाचण्यासाठी न्यूरललिंकने रुग्णांना निमंत्रण पाठवायला सुरुवात केली. त्यापैकी पहिल्या रुग्णावर सोमवारी शस्त्रक्रिया करुन मेंदूत टेलिपथी हे यंत्र बसवण्यात आलं आहे. 

5/7

कोरोनाच्या संकटाआधी न्यूरललिंकने पहिली चीप उंदरांच्या नंतर मेंढ्यांच्या मेंदूत बसवली. या चीपद्वारे त्या प्राण्यांचे मेंदू नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.  

6/7

शिवाय त्या चीपचा, मेंदू आणि शरीरावर काय परिणाम होतो याचाही अभ्यास केला. प्राण्यांच्या मेंदूतील या चीप बसवण्याच्या संशोधनामुळे न्यूरललिंक गेल्या काही दिवसात वादाच्या भोवऱ्यातही सापडली होती. 

7/7

सप्टेंबर 2023मध्ये अमेरिकन वृत्तसंस्थेने केलेल्या एका शोधमोहिमेतून यासंशोधनांच्या दरम्यान काही माकडांचा मृत्यू झाल्याचं पुढे आलं. त्यामुळे प्राण्यांवरील हे संशोधन मस्क यांच्या कंपनीला मोठा दंड ठोठावण्यात आला.