Monsoon Health Tips: पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांचं सेवन नक्की करा

पावसाळ्यात खराब पाण्यामुळे जीवजंतूचं प्रमाण वाढतं त्यामुळे डेंग्यु, मलेरिया, टायफॉइड यासारखे आजार जास्त वाढतात. अशावेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याठी आहारात ताज्या फळांचं सेवन नक्की करावं.   

Jun 14, 2024, 16:07 PM IST
1/8

पावसाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने रोगराई मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे सहसा बाहेरील फास्टफूड न खाता घरात तयार केलं जाणार सकस अन्न खावं असा सल्ला कायमचं डॉक्टारांकडून दिला जातो. त्याशिवाय रोज ताज्या फळांच सेवन केल्याने खोकला आणि ताप यासारखे आजार दूर राहण्यास मदत होते. 

2/8

पीच

जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर पीच खाणं फायदेशीर ठरतं. पीचमध्ये पोटॅशिअम, फोलेट यासारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.   

3/8

लिची

लिचीमध्ये अँटीऑक्सिडंट घटक जास्त प्रमाणात असतात,त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.ढगाळ वातावरणामुळे अनेकांना श्वास घेण्याचा त्रास होतो. लिचीचं आहारात सेवन केल्याने शरीरातील ऑस्किजनची पातळी वाढण्यास मदत होते.त्याशिवाय लिचीमध्ये व्हिटामीन सी असल्याने सर्दीच्या आजावर गुणकारी मानलं जातं. 

4/8

जांभूळ

पचनाशी संबंधित आजारावर जांभूळ खाणं फायदेशीर ठरतं. जांभळामध्ये कमी कॅलरीज असतात. त्याशिवाय लोह, पोटॅशियम आणि तसेच इतर आवश्यक जीवनसत्त्वांचा समावेश मोठ्या प्रमाणात आढळतात. 

5/8

पावसाळ्यात अनेकांना उलट्यांचा त्रास होतो, अशावेळी जांभळाचं सेवन केल्यास उलट्यांच्या त्रासावर आराम मिळतो. 

6/8

चेरी

पावसाळ्यातील वातावरण थंड असल्याने बऱ्याच जणांना संधीवाताचा त्रास जाणवत असतो. अशावेळी चेरीचं सेवन करणं फायेदशीर ठरतं. 

7/8

चेरीमुळे हाडांना मोठ्या प्रमाणात पोषकतत्वं मिळतात. जांभळात असलेल्या पोटॅशिअममुळे हाडांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

8/8

पपई

पपई या फळाचा गुणधर्म उष्ण असल्याने पावसाळ्यात खाणं शरीरासाठी आरोग्यवर्धक मानलं जातं. पपईतील पोषक तत्वांमुळे पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)