Covid 19: वटवाघूळ नव्हे तर 'या' जनावरामुळे करोनाचा फैलाव; चिनी वैज्ञानिकांचा मोठा खुलासा
Cause of Coronavirus: करोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे (Coronavirus) जगभरातील अनेक लोकांनी आपला जीव गमावला. चीनमधूनच (China) करोनाचा फैलाव झाला या दाव्यावर अनेक देश ठाम आहेत. तसंच यासाठी वटवाघूळ (Bat) कारणीभूत असल्याचे दावेही करण्यात आले. दरम्यान आता चिनी वैज्ञानिकांनी (Chinese Scientist) एक दावा केला असून करोनाच्या फैलावासाठी वटवाघून नव्हे तर रॅकून हा प्राणी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. करोनाच्या तीन वर्षानंतर चीनने हा दावा केला आहे. दरम्यान चीनने हा अभ्यास सार्वजनिक केला असला तरी त्यातील निरीक्षणं मात्र समोर आणलेली नाही.