Team India : विराट-रोहितला अनेक वर्ष लागली, सूर्याने फक्त 51 सामन्यात 'ती' कामगिरी केली

Suryakumar Yadav : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) टी20 क्रिकेटचा बादशाह म्हटलं जातं. सूर्यकुमार यादवने हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. वेस्टइंडिजविरुद्धच्या  (IND vs WI T2o) करो या मरोच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी करत विंडीच्या गोलंदाजांची पिसं काढली. सूर्यकुमार यादवने टीम इंडियाला (Team India) केवळ विजय मिळवूनच दिला नाही तर अशी एक कामगिरी केली. जी करायला विराट कोहली आणि रोहित शर्माला अनेक वर्ष लागली. 

| Aug 10, 2023, 18:44 PM IST
1/5

भारत आणि वेस्टइंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने 7 विकेटने विजय मिळवला. वेस्टइंडिजने विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने हे आव्हान तीन विकेटच्या मोबदल्यात पार केलं. या विजयबरोबरच सीरीजमधलं आव्हानही कायम ठेवलं आहे. 

2/5

टीम इंडियाच्या या विजयाचा खरा हिरो होता तो टी20 स्टार सूर्यकुमार यादव. पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या सूर्यकुमारची बॅट तिसऱ्या सामन्यात तळपली. फक्त 44 चेंडूत सूर्याने 83 धावांची खेळी केली. यात त्याने 10 चौकार आणि चार षटकार लगावले. 

3/5

चार षटकार लगावत सूर्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकारांचा टप्पाही पूर्ण केला. या विक्रमामुळे त्याने कायरन पोलार्डसह अनेक फलंदाजांना मागे टाकलं आहे. 

4/5

सूर्यकुमार यादव  'प्लेयर ऑफ द मॅच'चा मानकरी ठरली. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्याचं हा 12 पुरस्कार ठरलाय. रोहित शर्माला 11 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवण्यासाटी 148 सामने खेळावे लागले होते. सूर्याने ही कामगिरी केवळ 51 टी20 सामन्यात केली आहे. 

5/5

विराट कोहलीने आपल्या टी20 क्रिकेट कारकिर्दीत 15 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे. याासाठी त्याला 115 सामने खेळावे लागले. म्हणजेच विराट-रोहितला जी कामगिरी करण्यासाठी काही वर्ष लागली ती कामगिरी सूर्याने केवळ एका वर्षात करुन दाखवली आहे.