क्रिकेट कारकिर्दीत नावावर अनेक विक्रम, पण या 6 दिग्गज खेळाडूंचं शिक्षण किती माहितीये

Cricket : क्रिकेट जगतात या भारतीय क्रिकेटपटूंचं (Indian Cricketers) नाव आदराने घेतलं जातं. मैदानावर या क्रिकेटपटूंनी विक्रमांचे डोंगर रचले आहेत. यातल्या दोन क्रिकेटपटूंनी तर भारताला विश्व चषक (World Cup) जिंकून दिला आहे. तर एक क्रिकेटपटू आहे क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar). क्रिकेटमधले सर्व विक्रम सचिनच्या नावावर जमा आहेत. अगदी लहान वयात या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Criket) पदार्पण केलं. त्यामुळे शिक्षण पूर्ण कराण्यासाठी त्यांना वेळच मिळाला नाही. हे दिग्गज क्रिकेटपटू किती शिकले आहेत, हे आपण जाणून घेऊया.

| May 04, 2023, 22:00 PM IST
1/6

कपिल देव

1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने बलाढ्य संघांवर मात करत कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वषचक जिंकला. त्यानंतर कपिल देव यांनी मैदानावर अनेक विक्रम रचले. पण क्रिकेटमुळे कपिल देव यांनी महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडावं लागलं. त्यावेळी त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला

2/6

सचिन तेंडुलकर

क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधले जवळपास सर्व विक्रम आपल्या नावार केले. पण शिक्षण मात्र पूर्ण करु शकला नाही. सचिन केवळ बारावीपर्यंत शिकला आहे. मुंबईतल्या शारदाश्रम विद्यामंदिरातून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्याने शिक्षणाला रामराम केला.

3/6

झहीर खान

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या वेगवान गोलंदाजीवर भल्याभल्या फलंदाजांना नाचवणारा झहीर खान शैक्षणिक आयुष्यातही स्कॉलर होता. झहीर खानने बारावीत तब्बल 83 टक्के गुण मिळवले. त्यानंतर प्रवरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये त्याने प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगचं शिक्षण सुरु असतानाच झहीरला U-19 खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने कॉलेज ड्रॉप करत पूर्ण लक्ष क्रिकेटवर दिलं.

4/6

राहुल द्रविड

क्रिकेट मैदानावर ज्याला द वॉल म्हणून ओळखलं जायचं असा भारतीय क्रिकेट संघाचा तंत्रशुद्ध फलंदाज राहुल द्रविड मैदान आणि शिक्षण दोन्ही गोष्टीत अव्वल होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर द्रविडने सेंट जोसेफ कॉलेजमधून कॉमर्सची पदवी घेतली. त्यानंतर त्याने MBA शिक्षण सुरु केलं. पण एमबीए करत असतानच त्याला टीम इंडियातून बोलावणं आलं.

5/6

महेंद्रसिंग धोणी

भारतीय क्रिकेट संघाला जवळपास सर्व स्पर्धा जिंकून देणारा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे महेंद्रसिंग धोणी. धोणीने रांचीतल्या जवाहर विद्यामंदिरमधून दहावीचं शिक्षण पूर्ण केलं. दहावीत माहिला 66 तर बारावीत 56 टक्के गुण मिळाले. 1999 मध्ये त्याने Gossener College मध्ये स्पोर्ट्स कोट्यातून BCom ला प्रवेश घेतला. पण क्रिकेटमध्ये व्यस्त वेळापत्रकामुळे त्याला पदवी घेता आली नाही.

6/6

हार्दिक पांड्या

टीम इंडियातला ऑलराऊंडर आणि टी20 क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या एका मध्यम कुटुंबातून पुढे आला. हार्दिक कॉलेजची पायरीही चढू शकला नाही. नववीत तो नापास ढाला आणि त्यानंतर त्याने शाळाच सोडली. त्यानंतर त्याने आपलं पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रीत केलं.