2007 मध्ये 149 कोटींची कमाई, तरीही दीपिकाने 'या' चित्रपटासाठी फी घेतली नाही

दीपिका पदुकोणने 2007 मध्ये आलेल्या या चित्रपटासाठी फी घेतली नव्हती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 149 कोटींची कमाई केली होती. 

Soneshwar Patil | Nov 10, 2024, 12:35 PM IST
1/7

सिंघम अगेन

1 नोव्हेंबरला रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत आहे. 

2/7

महिला पोलीस

दीपिकाने या चित्रपटात महिला पोलीस अधिकारी शक्ती शेट्टीची भूमिका साकारली आहे. यानंतर रोहित शेट्टी महिला पोलिसांवर एक चित्रपट बनवणार आहे. 

3/7

सिंघम अगेन फी

रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोणने या चित्रपटासाठी 6 कोटी रुपये फी घेतली होती. पण तुम्हाला माहिती आहे का दीपिकाने एका चित्रपटासाठी कोणतीही फी घेतली नव्हती.

4/7

ओम शांती ओम

आम्ही बोलत आहोत 'ओम शांती ओम' चित्रपटाबद्दल. जो 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. 

5/7

149.87 कोटींची कमाई

शाहरुख खान आणि दीपिकाची या चित्रपटातील जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 149.87 कोटी रुपयांची कमाई केली होती. 

6/7

फी

या चित्रपटासाठी दीपिकाने फी घेतली नव्हती. पण ती रातोरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 

7/7

17 वर्षे पूर्ण

'ओम शांती ओम' चित्रपटाला 9 नोव्हेंबर 2024 रोजी 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात दीपिकाने शांती प्रियाची भूमिका साकारली होती.