दीपवीरच्या लग्नाला ऐतिहासिक बनवणार ही व्यक्ती

पाहा खास अपडेट 

Dakshata Thasale | Nov 13, 2018, 17:08 PM IST

मुंबई : 2018 मधील सर्वात चर्चेत असलेला विवाह म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचा. 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. रणवीर - दीपिकाच्या लग्नाच्या वेन्यू ते डिझाइनर कपड्यांपर्यंत तसेच पाहुण्यांच्या अरेंजमेंटपर्यंत करोडो रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. यांच्या लग्नाला आलीशान बनवण्यासाठी वेडिंग प्लानर वंदना मोहन हिचा मोठा वाटा आहे. 

1/4

वेडिंग प्लानर वंदना मोहन लग्नात अगदी छोट्या ते छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवते. लग्नात वंदनाची थीम ग्लॅमरस, आयकॉनिक आणि क्लासिक असते. याच गोष्टीमुळे दीपिका - रणवीर हे वंदनाकडे आकर्षित झालं. 

2/4

पार्थची बहिण तनवीच्या लग्नाची जबाबदारी देखील वंदनाकडे होती. तनवीने 2010 मध्ये फ्लोरेंसमध्ये लग्न केलं होतं. यासोबतच तिने बिझनेसमन सुनील वसानीच्या मुलीचं सोनमच्या लग्नाची जबाबदारी वंदनाकडे आहे. या दोघांनी देखील ऑस्ट्रेलियाच्या वियनामध्ये भव्य लग्न केलं होतं. 

3/4

यामध्ये सगळ्यात चर्चेत होतं ते, पार्थ जिंदल आणि अनुश्री जसानी यांच लग्न. पार्थ जिंदल हे  'जेएसडब्लू' कंपनीचे एमडी आहेत. पार्थ यांच लग्न वियनामध्ये 9 मे 2016 रोजी झालं. हा सोहळा 7 मे ते 9 मे पर्यंत चालू होता. 

4/4

दीपवीरच्या लग्नाला रॉय बनवण्यासाठी लोकप्रिय वेडिंग प्लानर वंदना मोहन सज्ज झाली आहे. वंदना दिल्लीची लोकप्रिय वेडिंग डिझाइनर असून तिला इव्हेंट मॅनेजमेंटचा 30 वर्षांचा अनुभव आहे. आणि तिची 'बॅकस्टेज प्रोडक्शन' नावाची इव्हेंट कंपनी आहे. तसेच ती वेडिंग डिझाइन कंपनी देखील चालवते. आतापर्यंत तिने अनेक कलाकारांच्या लग्नाचं डिझाइन केलं आहे.