महिलांची 'ती' अडचण दूर करण्यासाठी झाला Maggi चा जन्म! 'मॅगी' नावामागील लॉजिक काय?

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History: मॅगी नूडल्सचं नाव ऐकलं नसलेली व्यक्ती सापडणं तसं फार कठीण आहे. पटकन काहीतरी खायचं असेल तर सर्वात आधी आठवणारा हा पदार्थ आणि खास करुन हा ब्रॅण्ड भारताबरोबरच जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. तसे बाजारपेठेत नूडल्सचे अनेक ब्रॅण्ड आहेत पण मॅगीच अनेकांची पहिली पसंती आहे. मध्यंतरी मोठ्या वादात अडकल्यानंतरही या ब्रॅण्डने दमदार पुनरागमन करत पूर्वीपेक्षा अधिक मार्केट शेअर ताब्यात घेतला. पण या ब्रॅण्डचा जन्म महिलांच्या एका अडचणीमुळे झाला आहे असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल ना?

| Sep 06, 2023, 10:38 AM IST
1/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

2 मिनिटांमध्ये झटपट तयार होणारी मॅगी आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकानेच कधी ना कधी खाल्ली असणार. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकांना मॅगी ही इन्स्टंट फूड म्हणून आवडते. खरं तर बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे नूडल्स उपलब्ध आहेत. मात्र अनेकांची पहिली पसंती मॅगीच आहे.

2/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

मॅगीची किंमत वाढली तरी अनेकांची चिंता वाढते एवढ्या मोठ्या प्रमाणात या नूडल्स खाल्ल्या जातात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का या सर्वात लोकप्रिय इन्स्टंट फूडची कल्पना कुठून आली आणि मॅगीचा जन्म कसा झाला?

3/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

2 मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या या मॅगी नूडल्सला 'मॅगी' हे नाव कोणी दिलं ठाऊक आहे का? एवढा मोठा वाद झाल्यानंतरही या नूडल्सवर कायमची बंदी का घालण्यात आली नाही?

4/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

आजही कोट्यवधी लोकांच्या जीभेवर रेंगाळणारी चव म्हणून मॅगीकडे का पाहिलं जातं? भारतीय बाजारपेठेमध्ये मॅगीने कसा प्रवेश केला. यासंदर्भात जाणून घेऊयात...

5/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

आज चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या नूडल्सचा जन्म नाइलामुळे झाला आहे. स्वित्झर्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली होती आणि औद्योगिक क्रांती वेगाने होत होती. त्यावेळेस महिलांना कारखान्यांमध्ये काम करण्याचा अधिकारही देण्यात आला. 

6/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

मात्र कारखान्यातील काम आणि घरातील जबाबदारी अशी दुहेरी कसरत या महिलांना करावी लागत होती. त्यांना कामाच्या वेळेस कारखान्यांमध्ये थांबून नंतर घरी जाऊन जेवणही बनवायला लागायचं. 

7/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

कारखान्यातील काम आणि घरामध्ये स्वयंपाक करणं या साऱ्यासाठी महिलांना वेळ कमी पडायचा. याच माहिलांची अडचण दूर करण्यासाठी स्विस पब्लिक वेलफेअर सोसायटीने एक महत्त्वाचं पाऊल उचललं.

8/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

स्विस पब्लिक वेलफेअर सोसायटीने ज्यूलिअस मॅगी यांची मदत घेतली. ज्यूलिअस मायकल जोहानस मॅगी यांनी 1872 मध्ये महिलांची ही दुहेरी करसत समजून घेत त्यावर उपाय शोधण्यास होकार दर्शवला.

9/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

महिलांचा स्वयंपाकघरातील वेळ वाचावा म्हणून गव्हाचं पीठ केंद्रस्थानी ठेऊन काहीतरी वेगळं यामधून निर्माण करता येईल का याचा विचार ज्यूलिअस मॅगी यांनी सुरु केला. त्या आधी ते महिलांना गव्हाचं पीठ विकायचे. मात्र हा उद्योग फारसा चालला नाही. 

10/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

नंतर ज्यूलिअस मॅगी यांनी 1897 मध्ये एक पदार्थ तयार करुन विकण्यास सुरुवात केली जो फार लवकरच शिजायचा.

11/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

महिलांना जेवण बनवण्यासाठी लागणारा वेळ वाचावा म्हणून त्यांनी हा पदार्थ तयार करुन विकण्यास सुरुवात केली. इथेच आजच्या लोकप्रिय मॅगी नूडल्सचा जन्म झाला.

12/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

1897 च्या शेवटी सर्वात आधी जर्मनीमध्ये मॅगी नूडल्स तयार करण्यात आले. ज्यूलिअस मॅगी यांनी आपल्या कंपनीचं नाव मॅगी असं ठेवलं. यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. या नूडल्सचा सर्वांकडूनच उत्तम प्रतिसाद मिळाला.

13/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

लोक 2 मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या या नूडल्सच्या एवढे प्रेमात पडले की 1912 पर्यंत फ्रान्स आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये पटापट मॅगीचा स्टॉक संपू लागला. मात्र त्याच वर्षी ज्यूलिअस मॅगी यांचं निधन झालं. 

14/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

मात्र 1947 साली नेस्ले या जगप्रसिद्ध कंपनीने ज्यूलिअस मॅगी यांच्या मालकीच्या मॅगी कंपनीला विकत घेतलं. मात्र नेस्लेनं या नूडल्सचं नाव न बदलण्याचा निर्णय घेत त्यांची ब्रॅडिंग व मार्केटिंग करुन या नूडल्स घरोघरी पोहचवल्या. 

15/15

Did You Know How Maggi Noodles Got Its Name and History

नेस्ले इंडिया लिमिटेडने मॅगीला पहिल्यांदा 1984 साली भारतामध्ये आणलं. त्यावेळी मॅगी ही भविष्यात कोट्यवधी भारतीयांच्या जीभेवर राज्य करेल असं कोणाला वाटलंही नव्हतं.